मुंबई : सप्टेंबर 2025 पर्यंत एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्पष्ट केले आहेत.
केंद्र सरकारने हस्तक्षेप करून हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. एटीएममध्ये 500 रुपयांच्या नोटा वैध आणि सक्रिय राहतील, असे त्यांनी म्हटले आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना दिल्याचा दावा करणारी एक व्हायरल पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
सुरुवातीला 75 टक्के एटीएम आणि 31 मार्च 2026 पर्यंत 90 टक्के एटीएमना लक्ष्य करून टप्प्याटप्प्याने धोरण आखण्याचा दावा त्यात केला आहे. एटीएममधून फक्त 200 आणि 100 रुपयांच्या नोटाच उपलब्ध असतील, असेही त्यात सांगण्यात आले आहे.
अशा चुकीच्या माहितीपासून नागरिकांनी दूर राहावे. तसेच नेहमीच अधिकृत स्रोतांकडून आर्थिक बातम्यांची पडताळणी करण्याचे आवाहन केंद्र सरकारने 12 जुलै 2025रोजी केले आहे.