Ravi Rana News: शिंदे, ठाकरेही एकत्र येणार; आमदार रवी राणा यांचा दावा

Ravi Rana on Shinde Uddhav alliance: राजकारणात काहीही अशक्य नाही, असे सांगून रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरे हे पुन्हा राम आणि हनुमान यांच्या विचाराकडे परत येत आहेत.
Ravi Rana
Ravi RanaPudahri
Published on
Updated on

मुंबई: केवळ दोन राष्ट्रवादी काँग्रेसच नाहीतर येत्या पंधरा वीस दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे देखील एकत्र आलेले दिसतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.

राजकारणात काहीही अशक्य नाही, असे सांगून रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरे हे पुन्हा राम आणि हनुमान यांच्या विचाराकडे परत येत आहेत.

Ravi Rana
POP Ganesh Idols: मोठ्या गणेश मंडळांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न; पीओपी बंदी सुनावणीत दावा

काही दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे देखील एकत्र आलेले दिसतील. राजकारणात जे अशक्य वाटते, ते नेहमीच शक्य झालेले आपण पाहिले आहे. त्यामुळे हे घडू शकते, असे राणा यांनी ठामपणे सांगितले.

तसेच येणाऱ्या १५ दिवसांमध्ये सुनेत्रा पवार आणि शरदचंद्र पवार साहेब यांचे दोन्ही पक्ष (गट) एकत्र येतील, हे चित्र तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास सत्तेचे आणि नेतृत्वाचे वाटप कसे असेल, याचेही भाकीतही राणा यांनी वर्तवले आहे.

Ravi Rana
Mumbai Flower Market: मुंबईच्या बाजारात नैसर्गिक फुलांची आवक वाढली

राणा म्हणाले, दिल्लीतील राजकारण सुप्रियाताई सुळे पाहतील आणि राज्याचे नेतृत्व सुनेत्राताई पवार करतील. केंद्रात सुप्रियाताई मंत्री बनतील आणि संपूर्ण राज्य सांभाळण्याची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांच्याकडे राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news