

पुढारी ऑनलाईन डेस्क :
कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करुन हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने आज (दि. १३) पहाटे तळोजा तुरुंगात जीवन संपवले, असे वृत्त ANI ने दिले आहे.
बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीने आज पहाटे साडेतीनच्या सुमारास तळोजा तुरुंगात टॉवेलने गळफास घेऊन जीवन संपवले. शवविच्छेदनासाठी मृतदेह जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला. मागील साडेतीन महिन्यांपासून विशाल गवळी हा तळोजा तुरुंगात कैदेत होता, अशी माहिती तळोजा तुरुंग अधिकार्यांनी दिली.