Legislative Council Election: अजितदादांनी शब्द पाळला! जानकरांसाठी माघार घेणाऱ्या विटेकरांना विधान परिषदेचे तिकीट

उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पक्षाच्या नेत्यांची हजेरी
Rajesh Vitekar's application for Legislative Council
विधान परिषदेसाठी राजेश विटेकर यांनी मुंबई येथे उमेदवारी अर्ज दाखल केला.Pudhari News Network
Published on
Updated on

परभणी, पुढारी वृत्तसेवा: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी मंगळवारी (दि.२) मुंबई येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Rajesh Vitekar's application for Legislative Council
MLC polls | विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंच्या मिलिंद नार्वेकरांचा अर्ज दाखल

दोन जागांसाठी पक्षात मोठी चुरस

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विटेकर यांच्यासह पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना सोमवारी सायंकाळी उमेदवारी जाहीर करण्यात आली. महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या दोन जागांसाठी पक्षात मोठी चुरस होती. मात्र अजित पवार यांनी विटेकर व गर्जे या दोघांचे नाव या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निश्‍चित केले. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विटेकरांनी तत्पुर्वी व त्यानंतरही जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक, नगरपालिका आदी संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राखले होते.

Rajesh Vitekar's application for Legislative Council
Maharashtra Politics| विधान परिषद सभापतिपदाची निवडणूक घ्या

पक्ष दुभंगल्यानंतरही विटेकर अजित पवारांच्या सोबतच

पराभूत झाल्यानंतरही ते राष्ट्रवादीमध्ये सक्रीय राहिले. पक्ष दुभंगल्यानंतरही ते अजित पवारांच्या सोबतच राहिले. त्यातुनच परभणी लोकसभेची जागा महायुतीतून राष्ट्रवादी व विटेकरांना मिळणार हे स्पष्ट झाले होते. मात्र, बदलत्या समीकरणात त्यांना या निवडणुकीत थांबण्याची वेळ आली. त्याचवेळी पक्ष त्यांना विधान परिषदेसाठी संधी देणार असल्याचे स्पष्ट केले होते.

Rajesh Vitekar's application for Legislative Council
विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट; रिक्त ११ जागांसाठी होणार मतदान?

यावेळी पालकमंत्री संजय बनसोडे, गंगाखेडचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे आदींसह जिल्ह्यात पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news