

Raj Thackeray On Adani : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील आपल्या भाषणातून उद्योगपती गौतम अदानींवर टीका केली होती. त्यानंतर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना काँग्रेस शासित राज्यांनी देखील अदानींची गुंतवणूक घेतली आहे असं सांगत २०१४ नंतर देशाचा मोठा आर्थिक विकास झाला आहे पर्यायानं अदानींचा देखील विकास झाला आहे असं सांगितलं होतं. त्यावर आता राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देऊन उत्तर दिलं आहे.
राज ठाकरे यांनी मुंद्रा पोर्ट सोडलं र अदानींच्या हातात आता जेवढी बंदरे आहेत ती इतरांनी विकसित केली आहेत. त्यानंतर अदानींनी ती इतरांना गनपॉईंटवर आणून त्यांच्याकडून विकत घेतली आहेत असं सांगितलं. त्यांनी सिमेंट उद्योगाचं उदाहरण देऊन अदानींची ही वाढ कशी नैसर्गिक नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
राज ठाकरे म्हणाले, 'ज्या व्यवसायामध्ये गौतम अदानी कधीही नव्हते तो सिमेंटचा व्यवसाय त्यामध्ये आता ते दोन नंबरला आहेत. पहिल्या क्रमांकावर बिर्ला आहेत. त्यानंतर अदानीच आहेत. त्यांनी अल्ट्राटेक आणि अंबुजा अन् अजून काही कंपन्या विकत घेऊन हा व्यक्ती दोन नंबरला पोहचला आहे. गेल्या १० वर्षात हा व्यक्ती शुन्यातून थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. दुसऱ्यांचे व्यवसाय खेचून घेऊन तो दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. पॉवर, स्टील असे अनेक उद्योग तसेच आहेत.'
मुख्यमंत्र्यांना उद्येशून राज ठाकरे यांनी त्यांना इशारा देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, 'मला मुख्यमंत्र्यांना हेच सांगायचं आहे की हा विषय कोणाच्या ग्रोथचा नाहीये, तर ती ग्रोथ कशा प्रकारे झाली आहे. उद्योगपतीची वाढ कशी होतेय ही वाढ समजून घेणं गरजेचं आहे. लोकांनी ही वाढ समजून घेणं गरजेचं आहे.'
राज ठाकरे यांनी इंडोगोचा दाखला देत हा माणूस (गौतम अदानी) उद्या संपूर्ण देखाला वेठीस धरू शकतो असं सांगितलं. ते म्हणाले, 'उद्या हा एकच माणूस संपूर्ण देशाला वेटीस धरू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नुकतचं घडलेलं इंडिगोचं प्रकरणं. जे या देशात इंडिगोनं केलं. संपूर्ण देश स्टँड स्टीलवर आणला. सगळी विमानतळं बंद झाली. भारतातील ६५ टक्के हवाई वाहतूक ही एकट्या इंडिगोकडं देण्यात आली. त्या इंडिगोनं व्यवसाय ठप्प केल्यानंतर देशाचे काय हाल होतात हे आपण पाहिलं आहे.'
ते पुढे म्हणाले, 'हा धोका मुख्यमंत्र्यांनी समजून घेण्याची गरज आहे. त्यांना समजनं गरजेचं आहे. त्यांना समजलं असेलही मात्र सांगतील तर कोणाला? बरं हे उद्योग उभे करत असताना अदानी यांना अर्थसहाय्य कोणी केलं. कोणकोणत्या बँकांनी कर्ज दिलं. कोणत्या इतर संस्थांना अर्थसहाय्य करायला लावलं. उद्या जर गोष्टी कोसळल्या तर नोकऱ्या तर जातीलच देश बरबाद होईल. हा देश एकदिवस ठप्प होईल.
महाराष्ट्राच्या बाबतीत देखील राज ठाकरे यांनी इशारा देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, 'आता ते टूल वापरून महाराष्ट्रातील शहरं ज्यावेळी तुम्ही काबीज करायला जाता तो धोका महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे. माझं भाषणातलं भाष्य यावरतीच होतं. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं.'