

Raj Thackeray Comment After Meeting With state EC :
महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी आज दुसऱ्यांदा राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आपल्या खास ठाकरी शैलीत निवडणूक आयोगाचा समाचार घेतला. त्यांनी कोणी कोणाला काढले हेच कळत नाही असा मिश्किल टोला देखील लगावला. त्यांनी जर राजकीय पक्षांचं समाधान होत नसेल तर निडणूक घेऊ नका अशी मागणी केली.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेवेळी २०२४ च्या निवडणुकीतील एक किस्सा सांगितला. कांदीवली पूर्व मधील एका महिलेचं वय २३ वर्षे, तिच्या वडिलांचं नाव हे दीपक कदम त्यांचे वय ११७ वर्ष दाखवण्यात आलं आहे. चारकोपमधील नंदिनी चव्हाण यांच्या वडिलांचं वय १२४ वर्षे महेंद्र चव्हाण यांच्या वडिलांचं नाव ४३ वर्षे दाखवलं आहे. असं सांगत राज ठाकरे यांनी कोणी कोणाला काढलं आहे तेच कळत नाही असा खास ठाकरे शैलीत टोला लगावला. त्यानंतर सर्वजण हसू लागले.
राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, 'निवडणूक आयोय निवडणूक घेते तर राजकीय पक्ष निवडणुक लढवतात. याच राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मतदार याद्याच दाखविणार नसेल तर घोळ आहे, असा दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मतदार यादीमधील मतदाराचे वय ११७ आहे. यावरुन घोळ स्पष्ट होतो. जर मतदार यादीच पारदर्शी नसेल तर निवडणूक घेवू नका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली सहा वर्ष घेतलेल्या नाहीत. तुम्ही आधी निवडणूक मतदार यादीतील घोळ संपवा, सहा महिन्यानंतर निवडणुका घेतल्याने काही फरक पडत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज ठाकरे पत्रकार परिषद संपत आली असताना म्हणाले की, 'मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या धक्का बसला तसेच विजयी उमेदवारांनाहकी आपल्याला एवढे मतदान कसे मिळाले, याचाही धक्का बसला असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
सर्वात महत्त्वाचा भाग हा आहे की, निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत घोळ आहे. याची दुरुस्ती झाली पाहिजे. जोपर्यंत निवडणूक लढविणार्या सर्व राजकीय पक्षांचे याबाबत समाधान होत नाहीत तोपर्यंत निवडणूक घेवू नका. मतदार याद्यांबाबत राजकीय पक्षांचे समाधान व्हावे. ही आमची मागणी अत्यंत रास्त आहे, असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
... तेव्हा अजित पवारही होते
२०१७ लाही मी निवडणूक मतदार यादीतील घोळाबाबत बोललो होतो. तेव्हा अजित पवारही होते. तेही तावातावाने या विषयावर बोलत होते. आज त्यांनीही निवडणूक आयोगाकडे येणे आवश्यक होते, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.