

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाण्यामध्ये सर्वात जास्त परप्रांतीयांची संख्या आहे. इथे स्थानिक नागरिकांच्या समस्या सुटेना झालेत, त्यामध्ये परप्रांतीय लोकांची भर पडत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी आपला स्वाभिमान बाळगून व्यवस्थित जगले पाहिजे. तुम्ही सर्व जर शांत बसणार असाल किंवा तुम्हाला स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या, अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.21) परप्रांतियावर हल्लाबाेल केला. मनसेच्या वतीने आयाेजित वरळी व्हिजन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, ठाणे शहरात सर्व प्रथम परप्रांतीय लाेक येतात. यानंतर ते महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये जातात. राज्यात स्थानिक नागरिकांच्या समस्या सुटेना झालेत, त्यामध्ये परप्रांतीय लोकांची भर पडत असल्याचे संपूर्ण व्यवस्था वेठीस धरली जात आहे. तुम्ही सर्व जर शांत बसणार असाल किंवा तुम्हाला स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्यास्थानिक नागरिकांनी आपला स्वाभिमान बाळगून व्यवस्थित जगले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने सरकारवर टीका केली. जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही आणि हे समुद्रात बांधायला निघाले होते. अशी शब्दात त्यांनी कडाडून टीका केली. पुतळ्यायांवर पैसा खर्च करण्यापेक्षा गड किल्ल्यांवर पैसे खर्च करा असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले आहे.