मुंबई पूर्व उपनगराला पावसाने झोडपले

मुसळधार पावसानंतर मुंबईची तुंबई झालेली दिसतेय
Heavy rainfall In mumbai
भांडुपच्या कोकणनगर परिसरात साठलेले पावसाचे पाणीPudhari Photo
Published on
Updated on

भांडुप : मागील काही दिवस ऊसंत घेतलेल्या पावसाने बुधवार (दि.२५) मुंबई उपनगरात जोरदार हजेरी लावली. दिवसभर उघड झाप करीत असलेला पाऊस संध्याकाळी जोरदार बरसला. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, गोवंडी या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी देखील भरले.

Heavy rainfall In mumbai
लातूर जिल्ह्यात पाऊस, मांजरा धरण भरण्याच्या मार्गावर; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

भांडुपच्या कोकण नगर विभागात सखल भाग असल्याने मोठ्या प्रमाणात या भागात पाणी भरले होते. यामुळे काही काळ इथली वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसामुळे दृश्यमान एकदम कमी झाल्याने पूर्व द्रुतगती मार्ग आणि एलबीएस मार्गावर वाहनांचा वेग मंदावला होता.संध्याकाळी घराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची पावसामुळे तारांबळ उडाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरण थंडावले असले तरी नागरिकांची मात्र मोठी तारांबळ उडाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news