Rain Deficit Weather | पावसाची दांडी, तरीही तापमानात झाली घट

Minimum 26 Maximum 29 Degrees | किमान 26, तर कमाल तापमान 29 अंशांवर
Kolhapur Climate Change
Kolhapur Low Temperature (File Photo)
Published on
Updated on

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने दांडी मारली असली, तरीही तापमानात मात्र घट झाल्याचे सांताक्रुझ वेधशाळेच्या साप्ताहिक फोरकास्टमध्ये सांगण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेला ग्रीन अलर्ट कायम असल्याने मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने सध्या उघडीप दिली आहे. मुंबईत सध्या दिवसभर पावसाची तुरळक सर पडते, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

Kolhapur Climate Change
Mumbai news: मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील वाहतुकीत बदल, कोणते मार्ग राहणार बंद?

दिवसामागून दिवस कोरडे जात असल्याने मुंबईत सध्या कमाल तापमान तिशीखाली आले आहे. सांताक्रुझ वेधशाळेमध्ये रविवारी किमान 26 आणि कमाल 29 अंश सेल्सिअस तापमान होते. शनिवारच्या तुलनेत (24/30 अंश सेल्सिअस) किमान तापमानात वाढ, तर कमाल तापमानात घट झाली.

Kolhapur Climate Change
Mumbai News : निधीच्या टंचाईने बांधकाम खात्याची नवी कंत्राटे बंद

सोमवारीही रविवारचीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे. मात्र, मंगळवारी पारा पुन्हा तिशीवर पोहोचेल, असा अंदाज सांताक्रुझ वेधशाळेने वर्तवला आहे. सध्या उकाड्यात वाढ कायम आहे. रविवारी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 85 टक्के इतके होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news