Pudhari Maha Icon 2026: 'पुढारी महा-आयकॉन्स २०२६' सन्मान सोहळा उत्साहात

Pudhari Maha Icon 2026 Event: केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार
Pudhari Maha Icon 2026 Anil Kakodkar Lifetime Achievement
Pudhari Maha Icon 2026 Anil Kakodkar Lifetime Achievement PhotoPudhari
Published on
Updated on

Pudhari Maha Icon 2026 Mumbai

मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत आणि राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करणारा 'पुढारी' माध्यम समूहाचा 'पुढारी महा-आयकॉन्स २०२६' गौरव सोहळा गुरुवारी मान्यवरांच्या मांदियाळीत मुंबईत पार पडला. 'कर्तृत्वाचा अभिमान, महाराष्ट्राची शान' हे ब्रीद घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रांत अतुलनीय योगदान देत आयुष्य वेचणाऱ्या चार कर्तृत्ववान व्‍यक्तिमत्त्वाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याच वेळी पाच विभागांतील १७ मान्यवरांना 'पुढारी महा-आयकॉन्स २०२६' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुंबई : पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल हिरानंदानी ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांना 
‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. सोबत उद्योगमंत्री उदय सामंत, 'पुढारी'चे चेअरमन डॉ. योगेश जाधव, 'पुढारी'चे चेअरमन इमिरेटस्‌ व मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण अनिल काकोडकर.
मुंबई : पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल हिरानंदानी ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. सोबत उद्योगमंत्री उदय सामंत, 'पुढारी'चे चेअरमन डॉ. योगेश जाधव, 'पुढारी'चे चेअरमन इमिरेटस्‌ व मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण अनिल काकोडकर.Pudhari

मुंबईतील आयटीसी ग्रँड सेंट्रल हाॅटेलच्या सभागृहात झालेल्या या 'पुढारी' महा आयकॉन्स २०२६ सोहळ्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत प्रख्यात वैज्ञानिक, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण अनिल काकोडकर, पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन इमिरेटस्‌ आणि मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, ज्येष्ठ उद्योजक निरंजन हिरानंदानी, 'पुढारी' माध्यम समूहाचे चेअरमन तथा समूह संपादक योगेश जाधव आणि अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सचिनदादा धर्माधिकारी उपस्थित होते. विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या या सन्मान सोहळ्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई : पब्लिक सर्व्हिस तथा लोकसेवा क्षेत्रातील ‘जीवनगौरव’ पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. आप्पासाहेबांच्या वतीने त्यांचे चिरंजीव सचिनदादा धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते स्वीकारला. त्याप्रसंगी 'पुढारी'चे चेअरमन डॉ. योगेश जाधव, 'पुढारी'चे चेअरमन इमिरेटस्‌ व मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण अनिल काकोडकर व डॉ. निरंजन हिरानंदानी.
मुंबई : पब्लिक सर्व्हिस तथा लोकसेवा क्षेत्रातील ‘जीवनगौरव’ पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. आप्पासाहेबांच्या वतीने त्यांचे चिरंजीव सचिनदादा धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते स्वीकारला. त्याप्रसंगी 'पुढारी'चे चेअरमन डॉ. योगेश जाधव, 'पुढारी'चे चेअरमन इमिरेटस्‌ व मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण अनिल काकोडकर व डॉ. निरंजन हिरानंदानी. Pudhari

या सोहळ्यात चार पद्मविभूषण आणि पद्मश्री सन्मानांनी गौरवान्वित व्यक्तींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकाचवेळी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित मान्यवरांची मांदियाळी लाभल्याने खऱ्याअर्थाने या सोहळ्याला श्रीमंती लाभली. क्वचितच असा श्रीमंत सोहळा माध्यम जगताने अनुभवला असू शकतो.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'पुढारी' माध्यम समूहाचे चेअरमन तथा समूह संपादक योगेश जाधव यांनी प्रास्ताविकपर मनोगतात पुरस्कारांची भूमिका विशद केली.

मुंबई :  ‘पुढारी महाआयकॉन’ पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेले विविध क्षेत्रांतील मान्यवर. सुमारे तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद या मान्यवरांनी घेतला. यातील अनेक मान्यवरांचे कुटुंबीय या सोहळ्यात सहभागी झाले होते. व्‍यासपीठावरील वक्त्यांच्या भाषणांना आणि मनोगतांना या उपस्थितांनी वेळोवेळी दाद दिली.
मुंबई : ‘पुढारी महाआयकॉन’ पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेले विविध क्षेत्रांतील मान्यवर. सुमारे तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद या मान्यवरांनी घेतला. यातील अनेक मान्यवरांचे कुटुंबीय या सोहळ्यात सहभागी झाले होते. व्‍यासपीठावरील वक्त्यांच्या भाषणांना आणि मनोगतांना या उपस्थितांनी वेळोवेळी दाद दिली. Pudhari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तसेच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पब्लिक सर्व्हिस, लेगसी, इनोव्हेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, सोशल इम्पॅक्ट या श्रेणींमध्ये मान्यवरांना महा आयकाॅन्स जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाल, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पब्लिक सर्व्हिस श्रेणीतील जीवनगौरव पुरस्कार डाॅ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आला. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव सचिनदादा धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

इन्फ्रास्ट्रक्चर श्रेणीतील जीवनगौरव पुरस्कार हिरानंदानी ग्रुप ऑफ कंपनीचे निरंजन हिरानंदानी यांना प्रदान करण्यात आला.

सोशल इम्पॅक्ट 'पुढारी' महा आयकाॅन्स जीवनगौरव पुरस्कार डॉ. अभय बंग यांना जाहीर करण्यात आला. प्रकृतीच्या कारणास्तव बंग कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र चित्रफितीच्या माध्यमातून बंग यांनी या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या पुरस्काराच्या निमित्ताने सामाजिक कार्य, सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यमांचे सामाजिक कार्यातील सकारात्मक संवाद, ही प्रक्रिया नव्याने सुरू होत आहे, अशी भावनाही डॉ. बंग यांनी व्यक्त केली. इनोव्हेशन विभागातील जीवनगौरव पुरस्कार जेव्हा प्रख्यात अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना जाहीर झाला तेव्हा सभागृहातील उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट करत काकोडकर यांना मानवंदना दिली.

पब्लिक सर्व्हिस श्रेणीतील महा आयकाॅन्स

डाॅ. महेंद्र कल्याणकर : झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी

डाॅ. संजय चोरडिया : सूर्यदत्ता एज्यु. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष

लोकेश चंद्र : महावितरण कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

अनिष्का मालपाणी : ध्रुव ग्लोबल स्कूल - मालपाणी ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका

लेगसी विभागातील महा आयकाॅन्स

सिद्धार्थ अतुल शाह : चंदूकाका सराफ ज्वेल्सचे संचालक

संजय गणेश मिश्रा : 'बिग मिश्रा पेढा'चे व्यवस्थापकीय संचालक

विजय चंद्रन मेनन : मेनन अँड मेनन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

इन्फ्रास्ट्रक्चर विभागातील महा आयकाॅन्स

डाॅ. नितीन न्याती : न्याती इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

विलासकुमार पालरेशा : व्हीटीपी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष

योगेश पासलकर : निखील कन्स्ट्रक्शन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक

सोशल इम्पॅक्ट विभागातील महा आयकाॅन्स

डाॅ. महावीर पाटील : वर्धमान आर्थो केअरचे संचालक

डाॅ. युवराज येडुरे : महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन चे अध्यक्ष

डाॅ. लालसाहेब व्ही. शिंदे : सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट

लिमिटेडचे अध्यक्ष

इनोव्हेशन विभागातील महा आयकाॅन्स

सुशांत दोशी : अल्ट्रा ग्रीन पाॅवर नेक्सस प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष

पृथ्वीराज देशमुख : केन ग्रुपचे अध्यक्ष

सौरभ शाॅ : मॅक्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक

उत्तम जाधव : साई जीवन काॅर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news