Proton therapy : प्रोटॉन थेरपीमुळे 541 रुग्णांवर यशस्वी उपचार

खारघरच्या टाटा रुग्णालयात दोन वर्षांपासून सेवा, आंतरराष्ट्रीय रुग्णांनीही घेतला लाभ
Proton therapy
प्रोटॉन थेरपीमुळे 541 रुग्णांवर यशस्वी उपचारpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटर येथे दोन वर्षांपूर्वी कॅन्सरवर उपचारासाठी अत्याधुनिक प्रोटॉन थेरपी सेंटर सुरू करण्यात आले असून आतापर्यंत 541 रुग्णांवर येथे यशस्वी उपचार झाले आहेत. विशेष म्हणजे यातील 65 टक्के रुग्णांना सवलतीच्या दरात तर 27 टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात आले आहेत.

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत देशाच्या कानाकोपर्‍यातील आणि अगदी परदेशातील रुग्णांना उपचार मिळत आहेत. उपचार मिळालेल्या रुग्णांपैकी 52 टक्के रुग्ण पश्चिम भागातील, 23 टक्के पूर्व भागातील, 14 टषक्के उत्तर भागातील, 6 टक्के दक्षिण भागातील आणि 4 टक्के मध्य भागातील होते. तर 1 टक्के आंतरराष्ट्रीय होते. यामुळे हे सेंटर रुग्णांसाठी आधारवड ठरले आहे.

या ठिकाणी 360-डिग्री रोटेशन गॅन्ट्रीसह तीन रुग्ण कक्ष आहेत. जे नवीनतम पेन्सिल बीम स्कॅनिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज असून तीव्रता मॉड्युलेटेड प्रोटॉन थेरपी देण्यास सक्षम आहेत. या सेंटरचे उपसंचालक प्रभारी डॉ. सिद्धार्थ लष्कर यांनी सांगितले की, 15 ऑगस्ट 2023 रोजी सेवा सुरू झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत क्ट्रेक येथील प्रोटॉन थेरपी सुविधेत 541 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

यातील 146 रुग्णांना मोफत उपचार देण्यात आले किंवा रुग्णालयाने रुग्ण कल्याण निधी आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांमधून उभारलेल्या निधीतून मदत केली. यातील 86 बालरुग्ण होते. उपचार घेतलेल्या रुग्णांपैकी 38 टक्के रुग्णांना सीएनएस आणि 23 टक्के हाडांच्या गाठी आढळल्या. त्यानंतर 19 टक्के डोके आणि मानेचे गाठी, बालपणीचे गाठी, स्त्रीरोग, स्तन, प्रोस्टेट आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्यूमर आढळले.

अनेक संशोधन प्रकल्प सुरू

अ‍ॅक्ट्रेकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले की, ही केवळ उपचारपद्धती नाही तर कर्करोगाविरुद्ध भारताची वैज्ञानिक आणि मानवी आघाडी आहे. बीएआरसीच्या सहकार्याने प्रोटॉन थेरपीची प्रभावता सिद्ध करण्यासाठी येथे अनेक संशोधन प्रकल्प सुरू आहेत. सप्टेंबर 2025 मध्ये बेल्जियमच्या आयन बीम ऑप्लिकेशन्सच्या सहकार्याने पहिले जागतिक प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.

या केंद्रात बालकांवर भूल देऊन उपचार करण्याची सुविधा आहे. उपचारादरम्यान मुलांसाठी खेळण्यासाठी एक विशेष जागा देखील आहे. प्रोटॉन थेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी प्रेरक नावाचा एक स्वयंसेवी रुग्ण समर्थन गट तयार करण्यात आला आहे. जो रुग्णांमध्ये परस्पर सहकार्य, संवाद आणि माहितीची देवाणघेवाण करतो.

डॉ. सिद्धार्थ लष्कर, उपसंचालक, प्रोटॉन थेरपी सेंटर, खारघर टाटा मेमोरियल रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news