Pro Govinda League : प्रो गोविंदा लीग 2025 चा थरार उद्यापासून रंगणार मुंबईत

मालाडचे ‘ओम ब्रह्मांड’ पथक आता वाराणसी महादेव अ‍ॅसेन्डर्स
Pro Govinda League
प्रो गोविंदा लीग 2025 चा थरार उद्यापासून रंगणार मुंबईतpudhari photo
Published on
Updated on

मुंबईः ‘ग्लोबल व्हेंचर्स ’अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘अस्पेक्ट स्पोर्ट्स’च्या वतीने बहुप्रतीक्षित ’प्रो गोविंदा लीग 2025’ साठी पूर्वी ओम ब्रह्मांड साई गोविंद पथक (मालाड पश्चिम) म्हणून ओळखल्या जाणार्‍या या संघाचे आता 74 लाख रुपयांत अधिग्रहण केले असून त्यानंतर या पथकाचे वाराणसी महादेव अ‍ॅसेन्डर्स नावाने रिब्रँड करण्यात आले आहे.

मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे 7 ते 9 ऑगस्ट डार्विन ही स्पर्धा पार पडणार आहे. या अधिग्रहणावर अस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्सच्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती अक्षा कंबोज यांनी सांगितले की, वाराणसी महादेव अ‍ॅसेन्डर्स म्हणजे निव्वळ संघ नाही परंपरा आणि सांघिक कार्याद्वारे उदयास येणार्‍या भारताच्या युवकांच्या भावनेचे तो प्रतिनिधित्व करतो.

महाराष्ट्र सरकारची अधिकृत मान्यता लाभलेल्या प्रो गोविंद लीगचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही लीग, शतकानुशतके दहीहंडीच्या खेळात क्रांती घडवून आणेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

यंदाच्या मोसमाचे एकूण बक्षीस मूल्य 1.5 कोटी रुपयांचे असून ज्यात विजेत्यांसाठी 75 लाख रुपयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक संघासाठी 3 लाख रुपयांचा सहभाग प्रोत्साहन मूल्यासह, एक गंभीर स्पर्धात्मक व्यासपीठ म्हणून लीगची स्थिती मजबूत करते. श्रीमती अक्षा कंबोज यांच्या मालकीची वाराणसी महादेव अ‍ॅसेन्डर्स ही संस्था त्यांची प्रबळ भावना आणि वारसा राष्ट्रीय प्रकाशझोतात आणण्यासाठी ह् येत्या गोविंदात सज्ज होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news