Praveen Darekar | सहकाराची वज्रमूठ भक्कम व्हावी म्हणून राज्य सरकारला सर्वंकष अहवाल देणार

नाशिकमधील पहिल्या प्रशिक्षण शिबिरात सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची ग्वाही
नाशिक
नाशिक : पिंपळद येथे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था सहकारी फेडरेशनच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर. समवेत आमदार राहुल ढिकले, आमदार सरोज अहिरे आणि मान्यवर.Pudhari News Network
Published on
Updated on
Summary

ठळक मुद्दे

  • नेता होण्यासाठी सहकार लागतो, सहकारी संस्थांसाठी मात्र पुढारी पुढे येत नाहीत

  • पतसंस्था, सहकार संस्था चालवणे सोपे राहिलेले नाही. राज्याचा दौरा करून अभ्यास करू

  • फडणवीस सरकारच्या माध्यमातून चळवळीला दिशा देण्याचा प्रयत्न

नाशिक : ग्रामीण-शहरी सहकारी संस्था एकत्रित येऊन सहकाराची 'वज्रमूठ' भक्कम करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष म्हणून राज्याचा दौरा करून सहकारी संस्थांच्या, फेडरेशन, पतसंस्थांच्या अडचणी समजून घेऊ. त्यासंदर्भात सर्वंकष अहवाल दौरा करून राज्य सरकारला देऊ, अशी ग्वाही भाजपा गटनेते, मुंबई बँकेचे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे दिली.

नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी दरेकर बोलत होते.

या प्रसंगी नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले, आ. सरोज अहिरे, रायगड सहकारी संघाचे मानद सचिव रामदास मोरे, शिबिराचे आयोजक सुनील ढिकले, उपनिबंधक संदीप जाधव, सहकार प्रशिक्षक नितीन वाणी, साताऱ्याचे माजी जिल्हा उपनिबंधक जनार्दन शिंदे, रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, अकोला जिल्हा बँकेचे माजी सरव्यवस्थापक आर. एस. बोडखे आदी मान्यवरांसह नाशिक जिल्हा-शहरातून मोठ्या संख्येने सहकारातील कार्यकर्ते उपस्थित होते.

नाशिक
Pravin Darekar: राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी आमदार प्रवीण दरेकर

पतसंस्थांच्या अनेक अडचणी आहेत. सहकारी संस्था चालवणे सोपे राहिलेले नाही. अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. येणाऱ्या काळात राज्यातील सहकारी संस्थांच्या चळवळीचा अभ्यास करून त्याला दिशा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून करू, अशी ग्वाहीदेखील दरेकर यांनी दिली.

शिबिरात मार्गदर्शन करताना आ. दरेकर म्हणाले की, सहकारातील अत्यंत उत्तम शिबीर म्हणून नाशिकने नोंद केली. राज्य संघाच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यावर पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची पहिलीच संधी नाशिकच्या पवित्र भूमीत मिळत आहे. पतसंस्था चालवत असताना येणाऱ्या अडचणी, कशा पद्धतीने संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांनी काम करावे आणि येणाऱ्या स्पर्धेच्या युगात सर्वसामान्यांना मदत करणाऱ्या पतसंस्था सक्षम कशा राहतील, अडचणी कशा येणार नाहीत याचे उद्बोधन या निमित्ताने सुरू होत आहे. दरेकर पुढे म्हणाले, मी कल्पक कार्यकर्ता आहे. रचनात्मक काम झाले पाहिजे, त्यातून काही निष्पन्न झाले पाहिजे ही भूमिका घेऊन काम करतोय. मुंबईत स्वयंपुनर्विकास योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून मुंबईत २०-२२ इमारती उभ्या राहिल्या. ही सहकाराची ताकद आहे. विकासक जो नफा कमावतात, तो रहिवाशांना मिळावा, त्यांच्या स्वप्नातले घर मोठे व्हावे हे बँकेने ठरवले, सरकारचा राजाश्रय मिळवला. त्याच धर्तीवर पतसंस्थाही शेतकरी, सर्वसामान्यांच्या आयुष्यातही 'आमूलाग्र क्रांती' करू शकतील. राज्यात अनेक पतसंस्था आहेत. काही बँकांची उलाढाल नाही एवढी पतसंस्थांची उलाढाल आहे. या पतसंस्था ताकदवान झाल्या पाहिजेत, यासाठी सरकारच्या माध्यमातून लागेल ती मदत करू, असा विश्वासही दरेकरांनी दिला.

नाशिक
Pravin Darekar | उद्धव ठाकरे यांचे राज ठाकरेंबद्दलचे प्रेम पुतणा मावशीचे : प्रवीण दरेकर

केंद्राने सहकाराला महत्त्व दिले

केंद्रात आजवर कधीच सहकार खाते नव्हते. कृषी क्षेत्रातील छोटासा भाग म्हणून सहकाराकडे पाहिले जायचे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने केंद्रात सहकार खात्याची निर्मिती झाली. ते खाते अमित शहा यांनी स्वतःकडे ठेवले. आज सहकार धोरण

आलेय, देशात खऱ्या अर्थाने सहकाराला केंद्राच्या माध्यमातून कधी नव्हे एवढी मदत होताना दिसते आहे. केंद्र सरकारने प्रथमच सहकाराला महत्त्व दिले. परंतु महाराष्ट्रात ज्या ताकदीने सहकाराकडे लक्ष देण्याची गरज होती ती दिली गेली नाही. नेता होण्यासाठी सहकाराची सोबत लागते; पण सहकार संस्थांना ताकद देण्याची वेळ येते त्यावेळी कुठलाही पुढारी पुढे येत नाही, अशी खंत व्यक्त करून दरेकर म्हणाले, सहकारी संस्थांना ताकद दिली पाहिजे. त्या संस्था बळकट झाल्या पाहिजेत, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारने आवश्यक त्या गोष्टी केल्या पाहिजेत व त्यासाठी महाराष्ट्र राज्याचा शिखर संघ असणाऱ्या संघाचा अध्यक्ष म्हणून मी निश्चित प्रयत्न करेन, असा शब्द प्रवीण दरेकर यांनी दिला.

सहकार प्रशिक्षणाचा शुभारंभ नाशकातून

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्यानंतर प्रवीण दरेकर यांचा हा पहिला कार्यक्रम होता. सहकार क्षेत्रात प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून सहकारी संघाकडे पाहिले जाते. या इतिहासाला अनुसरून आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीची सुरुवात दरेकर यांनी नाशिकमधल्या प्रशिक्षण शिबिरापासून केली. या शिबिराला नाशिक परिसरातील सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी प्रचंड उपस्थिती लावली. सहकार प्रशिक्षणाचा शुभारंभच यानिमित्ताने नाशकातून झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news