Pradeep Purneakar Murder: "त्याची किंमत त्यांनी जिवाचे मोल देऊन चुकवली": प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी संजय राऊत काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस ठाणेकरांचे भविष्य अंधारात ढकलत आहेत
Pradeep Purneakar Murder case
Published on: 
Updated on: 

Pradeep Purneakar Murder: ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना गृहखात्याचे धिंडवडे काढणारी आहे. शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांच्या विरोधात त्यांचा राजकीय संघर्ष सुरू होता; स्थानिक मनोरमानगर येथे बिल्डर लॉबी आणि ड्रग्ज नेटवर्कविरुद्ध ते सतत आवाज उठवत होते. त्याची किंमत त्यांनी जिवाचे मोल देऊन चुकवली आहे, असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

ठाणे गुन्हेगारांचे, ड्रग्ज माफियांचे आश्रयस्थान

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, "ठाणे हे गुन्हेगारांचे, ड्रग्ज माफियांचे आश्रयस्थान बनले आहे. देवेंद्र फडणवीसांचे हे अपयश असून ठाणेकरांचे भविष्य अंधारात ढकलले आहे. प्रदीप पूर्णेकरांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही! लढवय्या शिवसैनिकाला दुःखाकुल अंतःकरणाने श्रद्धांजली."

Pradeep Purneakar Murder case
Pradeep Purneakar Murder: 'माझ्या वडिलांच्या हत्येमागे...', प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी मुलाचा मोठा दावा; राजेंद्र शिंदेंवर गंभीर आरोप

सीसीटीव्ही फुटेज समोर

ठाण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामध्ये दोन व्यक्ती दुचाकीवरून पुर्णेकर यांच्या कार्यालयाजवळ येताना दिसत आहेत. दोघांनीही हेल्मेट घातले होते. कार्यालयात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पुर्णेकर यांच्यावर गोळीबार केला.पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी एकूण चार राऊंड फायर केले. त्यापैकी दोन गोळ्या पुर्णेकर यांना लागल्या. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची माहितीही समोर आली आहे.

Pradeep Purneakar Murder case
Sanjay Raut : "तिच्यासह कुटुंबाच्या अब्रूचे धिंडवडे..." : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी पाच संशयित आरोपींची ओळख पटवली असून त्यापैकी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पप्या शिंदे आणि आकाश निमसे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. इतर संशयितांचा शोध सुरू आहे.या प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस करत आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण काय होते आणि या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news