महायुती आमदारांच्या बैठकीत PM मोदींनी काय दिला कानमंत्र?

PM Modi | पंतप्रधान आज मुंबई दौऱ्यावर
PM NArendra Modi In   Mahayuti MLAs Meetting
मुंबईतील बैठकीतून PM मोदींनी आमदारांना कानमंत्र दिला.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १५) नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले. त्याचबरोबर त्यांच्या हस्ते नौदलाच्या तीन मोठ्या युद्धनौका राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. त्यानंतर मोदी यांनी भाजप नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या आमदारांची बैठक घेऊन कानमंत्र दिला. त्यांनी 'हरे कृष्ण'ने आपल्या भाषणाला सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'देवा भाऊ' असा उल्लेख केला. (Mahayuti MLAs)

पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजकीय व सामाजिक जीवनात काम करताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. त्यासाठी दरवर्षी स्वतःचा मेडिकल चेक अप करून घ्या. घरातील पत्नी, मुलगी, आई यांच्याकडे विशेष लक्ष द्या. सामाजिक जीवनात वावरताना त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊन देऊ नका, असा मोलाचा कानमंत्र त्यांनी आमदारांना दिला.

आमदारांनी सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्या प्रकृतीकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे, यासाठी योगा किंवा तत्सम व्यायाम करा. मी स्वतः पहाटे उठून दररोज योगा करतो. मतदारसंघात ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही, त्यांच्यासाठी काम करून त्यांच्यासोबत विरोधकांनाही आपलेसे करून घ्या. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करा, असे ते म्हणाले.

विधान परिषदेच्या आमदारांनी एखादा मतदारसंघ दत्तक घेऊन चांगले काम करावे. अधिकाऱ्यांसोबत कामानिमित्त बोलताना नम्रपणे बोला व काम करून घ्या. बदली, दलाली अशा कामांपासून स्वतःला दूर ठेवा, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी यावेळी आमदारांना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news