PM Modi 75th Birthday | पीएम मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या ७५ बसस्थानकावर 'मोफत वाचनालय'; प्रथितयश लेखकांची पुस्तके मिळणार

Pratap Sarnaik | परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
Maharashtra ST bus stand library
PM Modi 75th Birthday(Pudhari Photo)
Published on
Updated on

Maharashtra ST bus stand library

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या प्रमुख ७५ बसस्थानकावर सर्वसामान्य लोकांसाठी " मोफत वाचनालय " सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

खासदार श्रीकांत शिंदे व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा एसटीच्या प्रमुख ७५ बसस्थानकावर परिसरातील सर्व सामान्य नागरिकांसाठी " मोफत वाचनालय " सुरू करणारं आहोत.

Maharashtra ST bus stand library
Pratap Sarnaik Mira Bhayandar Morcha | 'मी स्वतः मोर्चात सहभागी होतोय, हिंमत असेल तर अडवून दाखवा'; प्रताप सरनाईक यांचे पोलिसांना आव्हान

या वाचनालयात मराठी भाषेतील वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), कवी नारायण सुर्वे, पु.ल. देशपांडे, यांच्या सारख्या प्रथितयश व लोकप्रिय साहित्यिक, कवी यांची पुस्तके, कविता संग्रह, नामदेवराव ढसाळ, भालचंद्र नेमाडे, शंकर पाटील, व.पु. काळे, विश्वास पाटील, या लेखकांच्या कादंबऱ्या सर्वसामान्यांसाठी वाचनालयात ठेवण्यात येणार आहेत.

सदर पुस्तके संबंधित बसस्थानकावरील एसटी कर्मचाऱ्यांकडे नोंद करून लोक आपल्या घरी वाचनास घेऊन जाऊ शकतात व वाचन करून परत आणून देऊ शकतात. याबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही मौलिक संदर्भ ग्रंथ देखील या फिरत्या वाचनालयामध्ये उपलब्ध करून दिले जातील.

Maharashtra ST bus stand library
PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्‍त दिव्यांगांनी १.२५ किमी लांब वाढदिवस कार्ड केले तयार

अर्थात, ही सर्व सेवा मोफत असणार आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रे देखील दररोजच्या दररोज उपलब्ध करून दिली जातील. त्यामुळे मराठी भाषेचा समृद्ध वारसा चालवणारा "वाचन कट्टा " बसस्थानकाच्या परिसरात निर्माण होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news