Human trafficking case: पनवेलमध्ये वेश्या व्यवसायावर छापा; ६ पीडित महिलांची सुटका

या कारवाईत लॉज व्यवस्थापक, कॅशिअर व वेटर यांना अटक करण्यात आली असून फरार लॉज मालकाचा शोध सुरू आहे.
Human trafficking case
Human trafficking casePudhari
Published on
Updated on

कोपरखैरणे: नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पनवेल शहरातील एका लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन बांगलादेशी महिलांसह एकूण सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत लॉज व्यवस्थापक, कॅशिअर व वेटर यांना अटक करण्यात आली असून फरार लॉज मालकाचा शोध सुरू आहे.

पनवेल येथील हॉटेल राहुल पार्क, फॅमिली रेस्टॉरंट, गार्डन बार, लॉजिंग अँड बोर्डिंग येथे महिलांना ठेवून वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची गुप्त माहिती ८ जुलै रोजी पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा केली. ग्राहकाने संकेत दिल्यानंतर अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाच्या पथकाने लॉजवर छापा टाकला. छाप्यात दोन बांगलादेशी महिलांसह सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तपासात लॉजमध्ये महिलांना ठेवून ग्राहकांना पुरवत असल्याचे उघड झाले. बनावट ग्राहकाकडून २,५०० स्वीकारल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

या प्रकरणी लॉज व्यवस्थापक गामा नंदू सोनकर, कॅशिअर दिपू उमेश यादव आणि वेटर प्रियांशू रविदास यादव यांना अटक करण्यात आली आहे. लॉज मालक रमेश शर्मा हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे व पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेशकुमार अंचलवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news