MPSC Recruitment 2026: गुड न्यूज, गुड न्यूज, गुड न्यूज... पंकजा मुंडेनी दिली आनंदाची बातमी; पशुसंवर्धन खात्यात मेगा भरती

MPSC Recruitment 2026
MPSC Recruitment 2026pudhari
Published on
Updated on

MPSC Livestock Development Officer Recruitment 2026: राज्याच्या पशुधन मंत्री पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी गट अ या पदासाठी २७९५ तर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट अ या पदासाठी ३०८ जागांसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. यामुळे राज्यात सरकारी नोकर भरतीला लागलेला ब्रेक आता निघाला आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली की, 'गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज खूप दिवस झाले आपण ज्या अत्यंत आनंदाच्या बातमीची प्रतीक्षा करत आहात ती बातमी तुम्हा सर्वांना देण्यासाठी मला आनंद होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पशुधन विकास अधिकारी गट अ या पदासाठी 2795 तर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट अ या पदासाठी 308 जागांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झालेला आहे. 11 जून 2026 रोजी ही परीक्षा आहे आणि एवढे सर्व लोक पशुसंवर्धन खात्यामध्ये अधिकारी म्हणून जॉईन होतील. यामुळे पशुसंवर्धन खात्याच्या कामामध्ये खूप मोठा वेग येईल आणि आम्हाला ग्रामीण भागातील लोकांच्या आणि त्यांच्या पशुधनाची खूप चांगली काळजी घेता येईल.

काय आहेत महत्वाचे मुद्दे?

बंपर भरती: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुसंवर्धन विभागात एकूण ३१०३ पेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे.

पदांचा तपशील: यामध्ये पशुधन विकास अधिकारी (गट-अ) साठी २७९५ जागा आणि सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (गट-अ) साठी ३०८ जागांचा समावेश आहे.

परीक्षेची तारीख: या महत्त्वाच्या पदांसाठीची परीक्षा ११ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

विभागाला बळकटी: एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी रुजू झाल्यामुळे ग्रामीण भागातील पशुपालकांना आणि पशुधनाला अधिक दर्जेदार सेवा जलद गतीने मिळण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news