Surya Project: पालघरच्या सूर्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दिलासा; पात्र लाभार्थ्यांचे जमिनीवरील हक्क कायम

नेवाळे आणि हनुमाननगरमधील जमीन वाटपांची तपासणी; पात्र शेतकऱ्यांना फेरवाटप करून मिळणार सातबारा
Surya Project
Surya ProjectPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पामुळे बाधित मौजे नेवाळे येथील सर्व्हे क्रमांक ६८ आणि मौजे हनुमाननगर येथील सर्व्हे क्रमांक ५ मधील शासनातर्फे करण्यात आलेल्या जमीन वाटपांची तपासणी करून, पात्र लाभार्थ्यांचे हक्क कायम ठेवण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या जमिनीचे वाटप १९७० मध्ये झाले होते. मात्र प्रत्यक्ष वहिवाटीनुसार सातबाऱ्यावर नोंद झाली नव्हती. या निर्णयामुळे फेरवाटप करून शेतकऱ्यांना सातबारा मिळणार आहे.

Surya Project
Farmer Loan Recovery: बँकांनी वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे फिरकू नये; चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

नेवाळे येथील सर्व्हे क्रमांक ६८ मधील जमीन भूमिहीन, शेतमजूर आणि स्वातंत्र्य सैनिकांना करण्यात आलेल्या वाटपाच्या १९७० च्या आदेशांमधील अटी आणि शर्तींची तपासणी करण्यात येणार आहे.

ज्या प्रकरणांमध्ये अटी आणि शर्तींचा भंग झाला असून संबंधितांचा प्रत्यक्ष ताबा नाही, अशा प्रकरणांत सुनावणी घेऊन जमीन शासनखाती जमा करण्यात येईल. त्यानुसार संबंधित अधिकार अभिलेख रद्द करून दुरुस्त अभिलेख तयार करण्यात येतील.

मात्र, वाटप आदेशानुसार त्यांना दिलेल्या क्षेत्राचा प्रत्यक्ष ताबा असल्यास संबंधितांच्या नावाची अधिकार अभिलेखात नोंद असल्यास त्यांचे हक्क कायम ठेवून फेरवाटप केले जाईल. सूर्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नेवाळे आणि हनुमाननगर येथे पुनर्वसन विभागामार्फत करण्यात आलेल्या जमीन वाटपांच्या प्रकरणांचीही तपासणी करण्यात येणार आहे.

Surya Project
Maharashtra SIR voter list: मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना जादा अधिकार द्या; चोकलिंगम यांचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

ज्या प्रकरणात वाटप आदेशही उपलब्ध नाहीत आणि सातबारावरही संबंधितांची नोंद नाही, मात्र प्रत्यक्ष वहिवाट आढळून येते, अशा प्रकरणांत उपलब्ध पुराव्यांची तपासणी केली जाईल. अशा अतिक्रमणांपैकी कुटुंब हा घटक गृहीत धरून कमाल दोन एकरपर्यंतचे शेतीच्या वापरातील अतिक्रमण त्याच ठिकाणी विशेष बाब म्हणून नियमानुकूल करण्यात येणार आहे.

या प्रक्रियेत महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरच्या प्रतिमा तसेच भौगोलिक माहिती प्रणाली आणि ड्रोन सर्व्हेचा वापर करून भू-संदर्भित नकाशे तयार करण्यात येणार आहे .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news