

मुंबई : पुढारी ऑनलाईन
एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे दर महिन्याच्या ७ तारखेला झाले पाहिजेत. आमच्या खात्याची फाइल ही वित्त खात्यातून पुन्हा पाठवली जाते, मात्र अजित पवार यांच्याकडे पोहोचवली जात नाही. त्यामुळे मंत्री म्हणून मी वित्त खात्यात 5 तारखेला जाऊन बसणार. आज दुपारीच वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. या सरकारने मला एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं. एसटी राज्याची रक्त वाहिनी आहे. सर्व सामान्य जनतेशी निगडित आहे. ही जबाबदारी पेलन ही मी माझी परीक्षा समजतो. या एसटीला गतवैभव प्राप्त करून देणार अशी भूमिका प्रताप सरनाईक यांनी मांडली. आज एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं तोडगा काढण्यात यश आले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होतील. ज्यांचे अर्धे पगार झालेत त्यांचे येत्या मंगळवारपर्यंत होतील असे त्यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नाहीत. कर्मचाऱ्यांचे पगार अर्धे झालेत या विषयी मला काल समजले. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे व्हावेत. दर महिन्याच्या सात तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रोव्हिडंट फंडाचे पैसे वापरले नाही गेले पाहिजेत. PF चे पैसे कुठेही वापरायचे नाहीत अशी भूमीका त्यांनी मांडली.
एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडे हात पसरावे लागणार नाही. यासाठी प्रयत्न केले जातील. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक एसटी बसमध्ये पॅनिक बटण, CCTV, जीपीएसी यंत्रणा लावणार. आमच्या बस महिलांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने सुरक्षित असतील. एसटी कामगाराला विश्वासात घेऊन प्रताप सरनाईक काम करेल. त्यांना सुविधा देणार. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ज्या सवलती दिल्या त्या कोणत्याही सवलती बंद होणार नाही. उलट योजना अधिक वाढतील असे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं समर्थन आम्हाला आहे. दोन वर्षात या एसटीला कॉर्पोरेट रूप देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.