Operation Golden Sweep : विमानतळावर साडेदहा किलो सोने जप्त

ऑपरेशन गोल्डन स्वीप; आठ विदेशी प्रवाशांसह तेरा जणांना अटक
Operation Golden Sweep
विमानतळावर साडेदहा किलो सोने जप्तFile Photo
Published on
Updated on

मुंबई : ‌‘ऑपरेशन गोल्डन स्वीप‌’अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तेरा जणांना महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यात सहा श्रीलंकन, दोन बांगलादेशी, विमानतळावरील दोन कर्मचारी, दोन हॅण्डलर आणि मुख्य आरोपीचा समावेश आहे. त्यांच्याकडून या अधिकाऱ्यांनी तब्बल 12 कोटी 58 लाख रुपयांचे 10 किलो 448 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे.

संतोष विनोद कनोजिया, राहुल सुभाष जाधव, मोहम्मद रिमशान मोहम्मद रफिक, अनिल गुरुशांत अरमान, मोहम्मद कमाल हुसैन, मोहम्मद साजिथ मोहम्मद शालिहीन, महफुज आलम, मोहम्मद रशीद मोहम्मद निजार, मोहम्मद इफ्तिकार मोहम्मद जौफर, सैनूल इनाफ सैनूल इब्राहिम, मोहीदीन रिझलान सराफुल अनाम अशी या प्रवाशांसह कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

सोने तस्करीत एका आंतराष्ट्रीय टोळीचा सहभाग असून या टोळीतील आरोपी विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने सोने तस्करी करीत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे आरोपींच्या अटकेसाठी या अधिकाऱ्यांनी ‌‘ऑपरेशन गोल्डन स्वीप‌’ मोहीमेतंर्गत कारवाई सुरु केली होती.

Operation Golden Sweep
Gold Ornaments Stolen: वीस लाखांच्या सोन्याची तारकपूर बसस्थानकातून चोरी

यावेळी विदेशातून आलेल्या सहा श्रीलंकन, दोन बांगलादेशी नागरिकांना या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांनी विदेशातून मोठ्या प्रमाणात सोने आणले होते. ते सोने त्यांनी विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना, या कर्मचाऱ्यांनी दोन हॅण्डलर आणि मुख्य आरोपी रिसीव्हरकडे दिल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी या सर्वांना विमानतळ परिसरातून ताब्यात घेतले.

या कारवाईत अधिकाऱ्यांनी तेराजणांना अटक केली. त्यांच्याकडून 10 किलो 448 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले असून त्याची किंमत तब्बल 12 कोटी 58 लाख रुपये इतकी आहे. या सर्वांना अटकेनंतर शनिवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Operation Golden Sweep
Municipal elections : पहिला बार नगरपालिका, नगरपरिषदांचा?

आंतरराष्ट्रीय टोळी

सोने तस्करी करणारी ही आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचे तपासात समोर आले आहे. ही टोळी दुबई, सिंगापूर, बँकाँक आणि ढाका येथून मुंबईत सोने घेऊन येत होती. त्यानंतर ते सोने विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने विमानतळाबाहेर पाठविले जात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news