Old Monk Sales Ban: राज्यात 'ओल्ड मंक' च्या विक्रीवरील बंदी कायम; स्थगिती हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार

कंपनीची मजकूर बदलण्याची तयारी
Old Monk Sales Ban
Old Monk Sales BanPudhari
Published on
Updated on

मुंबई: रम, व्हिस्की उत्पादनांमध्ये कृत्रिम फ्लेवर्सचा वापर केल्याने ब्रँड्सच्या विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीला स्थगिती देण्यास हायकोर्टाने सोमवारी एका सुनावणीत नकार दिला. प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. गौतम ए. अंखाड यांच्या खंडपीठाने बाटलीवरील '७ इयर्स ओल्ड ब्लेंडेड' (७ वर्षे जुने) आणि 'वेरी ओल्ड वॅटेड' या शब्दांवर आक्षेप घेतला.

या दाव्यांमुळे बाटलीमध्ये ७ वर्षे जुनीच दारू आहे, असा त्यांचा गैरसमज होतो, असे निरीक्षण नोंदवले. यामुळे 'ओल्ड मंक'च्या प्रेमींसाठी मोठा झटका बसणार आहे.

Old Monk Sales Ban
Fake MPCB Officer Extortion: तोतया MPCB अधिकाऱ्याला अटक; व्यावसायिकाला कारवाईची धमकी देऊन खंडणी

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने काही प्रमुख ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या बंदीविरोधात मॅकडोवेल्स रम' बनवणारी 'युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड' आणि 'ओल्ड मॉन्क'चे उत्पादक 'मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर ब्रुअरीज' यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. गौतम ए. अंखाड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने ज्येष्ठ वकील नवरोज सीरवाई यांनी, नियमांनुसार लेबलवर ब्लेंडेड स्पिरिट्सचा फरक स्पष्ट केला जातो.

Old Monk Sales Ban
MPSC Paper Leak Case: MPSC पेपरफुटी प्रकरणात नवी माहिती; गोपाळ मराठे कौटिल्य क्लासेसचा माजी विद्यार्थी

खंडपिठाने याची दखल घेत 'तुम्ही जनतेची दिशाभूल करत आहात... ७ वर्षे जुने म्हणजे ७ वर्षे जुनेच असायला हवे! ' असे बोल सुनावताना प्रत्यक्ष न्यायालयात बाटलीचे बॉक्स तपासले आणि त्यावर कृत्रिम स्वाद (फ्लेवर) जोडल्याबद्दल लिहिलेल्या अत्यंत बारीक अक्षरांवर निशाणा साधला.

बॉक्सच्या प्रत्येक कोपऱ्यात भिंगाचा वापर करूनही ते सहजासहजी दिसत नसल्याचे निरीक्षण खंडपिठाने नोंदवले. तसेच काही बाबींवर कंपनीची बाजू योग्य असली तरी काही मुद्द्यांवर त्यांची चूक असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याने असा कोणताही अंतिम दिलासा दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला. या कारवाईमुळे 'ओल्ड मंक' रमच्या प्रेमींसाठी मोठा झटका बसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news