Ola Uber Strike: मुंबई- पुण्यातील ओला, उबर कॅबचालक संपावर, या आहेत मागण्या

App taxi strike: मुंबईच नव्हे तर पुणे, नागपूरसारख्या महानगरांतही 90 टक्के अ‍ॅप कॅब बंद आहेत.
App taxi strike
अ‍ॅप कॅबचालक संपावर!pudhari photo
Published on
Updated on

Ola Uber Strike Mumbai Pune Update

मुंबई : ओला, उबरसारख्या अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवांच्या चालकांना प्रतिकिमी फक्त 8 ते 9 रुपये देण्यात येत असून इतर वाहतूक खर्चामुळे चालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याने अ‍ॅप आधारित टॅक्सी चालक संपावर गेले आहेत. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रिक्षा, टॅक्सी वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले की, केवळ मुंबईच नव्हे तर पुणे, नागपूरसारख्या महानगरांतही 90 टक्के अ‍ॅप कॅब बंद आहेत. तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.

App taxi strike
Robbery in Pune: पन्नास लाखाची रोकड हिसकावली; पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात जबरी चोरीचा प्रकार

रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप हे मंडळ कार्यान्वित झालेले नाही. या मंडळामध्ये अ‍ॅप आधारित टॅक्सी चालकांचाही समावेश करावा, कारभार पारदर्शक व्हावा यासाठी कामगार संघटनांच्या प्रतिनिधीची मंडळावर नियुक्ती करावी, अशी संपकरी कॅबचालकांची मागणी आहे.

इंधन, वाहतूक आणि इतर दैनंदिन खर्चात वाढ झाल्याने अ‍ॅप आधारित टॅक्सीसेवा चालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच बाईक टॅक्सीसंदर्भात घोषणा झाल्यामुळे अ‍ॅप आधारित टॅक्सी चालक कमालीचे अस्वस्थ झाले आणि त्यांनी हा संप सुरू केला. सीएसएमटीजवळील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात बुधवारी शेकडो चालक सहभागी झाले.

बाईक टॅक्सीला विरोध

सध्या रिक्षा व टॅक्सी चालकांचा व्यवसाय संकटामध्ये आहे. असे असताना बाईक टॅक्सीला परवानगी देणे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळेल. कुटुंबे रस्त्यावर येतील, असे सांगत अ‍ॅप आधारित चालकांनी बाईक टॅक्सीला विरोध केला आहे.

App taxi strike
रात्री उशिरा कॅबने प्रवास करताय ? हे जरूर वाचा
  • मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह महामुंबई प्रदेशात रोज 75 हजार ओला, उबर या अ‍ॅप कॅब धावतात.

  • सतत लोकल प्रवासात होणारा खोळंबा आणि त्यातून कार्यालयांमध्ये पडणारा लेट मार्क किंवा महत्त्वाच्या बैठकांना मारावी लागणारी दांडी यामुळे महत्त्वाच्या कामांसाठी महामुंबईकर अ‍ॅप कॅब पसंत करतात.

  • दिवसाला 3.5 लाख अ‍ॅप कॅब फेर्‍या बुक होतात. संपामुळे या सर्व फेर्‍या थांबलेल्या आहेत.

अ‍ॅप आधारित सेवेतील चालकांच्या मागण्या

  • प्रवाशांच्या तक्रारीची शहनिशा न करता किरकोळ कारणांवरून परस्पर आयडी रद्द करू नये.

  • प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेले दर सर्व अ‍ॅप आधारित सेवेसाठी लागू करावे.

  • आरटीओने लागू केलेल्या दरापेक्षा कमी दर घ्यायचे असल्यास त्या कॅब ग्रीगेटर कंपन्यांनी स्वतःच्या खिशातून द्यावे.

  • चालकांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निर्धारित केल्याप्रमाणेच दर मिळावेत.

  • प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने कूलकॅब वाहनांसाठीचे दर ठरवताना एसयूव्ही श्रेणीतील प्रवासी वाहनांचे दर वेगळे ठरवावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news