October Heat: ऑक्टोबर हीटचा कहर! मुंबईत ३८, ठाण्यात ३८.८ तर रत्नागिरीत ३९.२ अंश तापमान

मुंबई, ठाणे आणि पालघरला हवामान विभागाचा यलो अलर्ट; वाढत्या उष्णतेमुळे कोकण किनारपट्टीवरील नागरिक हैराण
Heatwave
HeatwavePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: ऑक्टोबरचा चटका वाढू लागल्याने मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टी रोज अक्षरश: होरपळून निघत आहे. मंगळवारी मुंबईचा पारा ३८ अंश सेल्सिअसवर तर ठाण्याचा पारा त्याच्याही वर ३८.८ वर पोहोचलेला होता.

ऑक्टोबरमधील वाढत्या तापमानामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरासाठी भारतीय हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

Heatwave
Illegal Flat Registration Rules: फ्लॅट खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी! अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीला सरकारचा लगाम

पुढील दोन दिवस उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. बुधवारी आणि गुरुवारी मुंबईत सरासरी कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमानही सरासरी २५ अंश सेल्सिअस इतके असेल.

मुंबईत सकाळी १० वाजल्यापासून सूर्याचा प्रकोप जाणवत असून, सायंकाळी ४ वाजल्यानंतर उन्हाचा दाह कमी होत आहे. आर्द्रतेचे (७० टक्के) प्रमाण जास्त असल्याने दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत आहे.

Heatwave
Maharashtra Corporation Appointments: महामंडळ नियुक्त्यांचा तिढा कायम! भाजप-अजित पवार गटाच्या याद्या तयार, शिंदेंच्या यादीची प्रतीक्षा

पालघरमध्ये कमाल तापमान ३७ अंशांवर पोहोचले आहे. पालघरमध्ये किमान तापमान २४ अंशांच्या आसपास असल्याने दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्रीही उकाडा यामुळे नागरिकांची काहिली होत आहे.

आज - उद्याचा अंदाज

१३ ऑक्टोबर ३८ अंश सेल्सिअस

१४ ऑक्टोबर ३७ अंश सेल्सिअस

१५ ऑक्टोबर ३७ अंश सेल्सिअस

रत्नागिरीत पारा ३९.२ अंशांवर!

जिल्ह्यात मंगळवारी तापमानाने ३९.२ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. तापमानाने ऑक्टोबर महिन्यातील १४३ वर्षांचा उच्चांक मोडल्याचा दावा करण्यात येत असून यंदाचे तापमान सरासरीपेक्षा ७.६ अंशांनी अधिक असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी २० ऑक्टोबर १९७७ रोजी रत्नागिरीत ३७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news