मुंबई : मिठी नदीवरील पुलांची उंची वाढवण्यासह पिलरमधील अंतर कमी करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून वांद्रे ते धारावीदरम्यानचे मिठीच्या प्रवाहातील अडथळे दूर झाले आहेत. आता दुसरा टप्पा हाती घेतला असून पुढील अठरा महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अधिक जलद होऊन, मिठीचा पुराचा धोका कमी होईल, असा दावा महापालिकेने केला आहे.
मोठ्या पावसात दरवर्षी मिठी नदीला पूर येता. यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे प्रचंड हाल होतात. पूर येण्यामागे अनेक कारणे असून यात वाहतूक पुलांचा नदीच्या प्रवाहाला अडथळा हे एक मुख्य कारण आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने मिठी नदीवरील पुलांची उंची वाढवण्यासह पिलरमधील अंतर कमी करण्याचे काम होती घेतले आहे. दोन टप्प्यांत ही कामे होणार आहेत. यातील पहिल्ला टप्पा वांद्रे ते धारावी हा पूर्ण झाला असून येथील पुलाची पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील पुलांचे काम 18 महिन्यांत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. या कामाचाही लवकरच शुभारंभ होणार असून जून 2027 पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहातील मुख्य अडथळा कायमस्वरूपी दूर होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.