OBC Reservation: ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास दोन हात करण्याची तयारी; ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त दुग्धाभिषेक व अभिवादन सोहळा चर्चगेट येथील होळकर स्मारकाजवळ झाला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
prakash shendge
prakash shendgePudhari
Published on
Updated on

मुंबई: ओबीसी समाजाचे हक्काच्या आरक्षणाला सरकारने धक्का लावू नये. आमच्या हक्काचे आरक्षण इतरांना दिले तर सरकारशी दोन हात करू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी रविवारी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त दुग्धाभिषेक व अभिवादन सोहळा चर्चगेट येथील होळकर स्मारकाजवळ झाला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

prakash shendge
Mumbai Methanol Inspection: मिथेनॉल खरेदीदारांवर उत्पादन शुल्कचा डोळा

प्रकाश शेंडगे म्हणाले, राज्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस. टी.) मध्ये समावेश करावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. राज्यात किती सरकारे आली तरी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश त्यांनी केला नाही.

prakash shendge
Mango Price Drop: नवी मुंबई एपीएमसीत आंब्यांचे दर घसरले; परदेशी फळांच्या आवकेमुळे ग्राहकांना दिलासा

याबद्दल समाजामध्ये आजही खंत आहे. आम्हाला पैसा नको, एस.टी. आरक्षण द्या. दिवंगत शिवाजीबापू शेंडगे यांनी धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण मिळवून दिले. त्यावर हा समाज कसा बसा तगलेला आहे. सरकारने एस. टी. आरक्षणाची मागणी पूर्ण करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news