

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या निमित्त राज्यभरातील कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वावर विधान भवनात दिसून येत आहे. मोठी गर्दी होत असल्याच्या तक्रारी अनेक आमदारांकडून करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विधान भवन परिसरातील वाढती गर्दी लक्षात घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी अधिवेशन काळात विधानभवनात सरसकट प्रवेश बंदी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी प्रवेश दिला जाणार आहे. (Maharashtra Budget Session)