

मुंबई : सुमारे सात कोटींच्या ड्रग्जसहित नऊ आरोपींना मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यात एका नायजेरियन नागरिकाचा समावेश असून या आरोपींकडून पोलिसांनी कोकेन, एमडी आणि ड्रग्जमिश्रित गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सांताक्रूझ येथे काही विदेशी नागरिक कोकेनची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून एका नाजयेरियन नागरिकाला अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी 523 ग्रॅम वजनाचे कोकेन ताब्यात घेतले. त्याची किंमत सव्वापाच कोटी रुपये इतकी आहे. दुसर्या घाटकोपर युनिट कार्यालयात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील तीन वॉण्टेड आरोपींना अटक केली होती. यापूर्वी त्यांच्या दोन सहकार्यांना पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांत ते तिघेही वॉण्टेड आरोपी होते, ते उत्तर प्रदेशात वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच या पथकाने तिन्ही आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक केली होती.