कोणताही नवीन महिना नवे बदल घेऊन येत असतो. आगामी ऑक्टोबरही त्याला अपवाद नसून, सरकारने आर्थिक बाबींशी निगडित विविध नियमांत केलेले बदल पुढील महिन्यापासून लागू होत आहेत. हे बदल कोणते, त्याचे परिणाम काय, हे जाणून घेऊया...
नव्या नियमानुसार, या योजनेचे खाते यापुढे केवळ मुलीचे जन्मदाते आई- वडील किंवा कायदेशीर पालकच उघडू शकतात. आजी-आजोबांनी नातीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पूर्वी उघडलेले खाते आता आई-वडील किंवा पालकांच्या नावे ट्रान्स्फर करावे लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या योजनेंतर्गत एकाच नावावर उघडलेली दोनपेक्षा अधिकची खाती बंद केली जाणार आहेत.
अल्पवयीनाच्या नावे उघडलेल्या खात्यावर आता पोस्ट ऑफिस बचत खात्याप्रमाणे व्याज मिळेल. संबंधित अल्पवयीन प्रौढ झाल्यानंतर पीपीएफचा व्याज दर लागू होईल आणि खात्याचा मॅच्युरिटी कालावधी प्रौढ झाल्याच्या तारखेपासून मोजला जाईल. एकापेक्षा जास्त खाती असणाऱ्यांना केवळ प्राथमिक खात्यावर पीपीएफचा व्याज दर लागू असेल. गुंतवणुकीच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिकची रक्कम विनाव्याज परत केली जाईल.
फ्यूचर्स आणि ऑप्शन्स : या ट्रेडिंगवरील सिक्युरिटीज ट्रान्झेंक्शन टॅक्समध्ये अनुक्रमे ०.०२, ०.१ ने वाढ होणार असल्याने हे ट्रेडिंग महागणार असून, यापासून गुंतवणूकदारांना दूर ठेवण्याचा उद्देश यामागे आहे.
बोनस शेअर : सेबीच्या टी+२ या फ्रेमवर्कमुळे बोनस शेअर क्रेडिट आणि ट्रेडिंग यातील कालावधी कमी करून आता सर्व बोनस शेअर्स रेकॉर्ड डेटनंतर दोन दिवसांत ट्रेडिंगसाठी उपलब्ध होतील. बाजाराच्या कार्यक्षमतेत सुधारणेचा उद्देश यामागे आहे.
शेअर बायबॅक : गुंतवणूकदारांना आता शेअर बायबॅकवर मिळणाऱ्या लाभांशावर समान कर लागू होईल.
- केंद्र, राज्य सरकारच्या किंवा फ्लोटिंग रेट असलेल्या रोख्यांवर आता १० टक्के दराने टीएसएस आकारला जाईल. रोख्यांमार्फत होणारी कमाई १० हजारांवर असेल, तर हा टीडीएस कापला जाणार आहे.
- जीवन विमाधारकाला पुढील महिन्यापासून पेआऊटवरील टीडीएसमध्ये कपातीचा लाभ मिळेल. टीडीएसचा दर ५ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आणला जाणार आहे.
- आयटीआर दाखल करताना तसेच नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करताना आता आधार एनरोलमेंट आयडीचा वापर करता येणार नाही. आधारचा दुरुपयोग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- पंजाब नॅशनल बँकेच्या निमशहरी आणि मोठ्या शहरांतील ग्राहकांना त्यांच्या खात्यांवर आता अनुक्रमे १ हजार, २ हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतील; अन्यथा त्यांना ५० ते २५० रुपये दंड द्यावा लागेल. - एचडीएफसी बँकेचे इनफिनिया क्रेडिट कार्डधारक आता दर तिमाहीत अॅपलच्या एकाच उत्पादनासाठी पॉईंट रिडीम करू शकतील. तनिष्क व्हाऊचरसाठीची रिडम्पशन मर्यादाही प्रतितिमाही ५० हजार केली आहे. - आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट कार्डधारकांना विमानतळावर कॉम्प्लिमेंट्री लाऊंज अॅक्सेस मिळविण्यासाठी आता सरलेल्या तिमाहीत कार्डद्वारे किमान दहा हजार रुपये खर्च करणे बंधनकारक असेल