समीर वानखेडे नोकरी वाचवण्यासाठी निवडणूक लढवतील : नवाब मलिक
पुढारी ऑनलाईन डेस्क : नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे माझी झोनल डायरेक्टर IRS अधिकारी समीर वानखेडे हे नोकरी वाचविण्यासाठी निवडणूक लढवतील, असा दावा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज (दि.२८) केला. (maharashtra assembly polls)समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाकडून तात्पुरते संरक्षण आहे. सीबीआय त्यांची चौकशी करत आहे. या प्रकरणाचा तपासात अनेक बाबी उघड होतील, असेही त्यांनी म्हटलं आहे.
नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे माझी झोनल डायरेक्टर IRS अधिकारी समीर वानखेडे हे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळं चर्चेत आले होते. आर्यन खानला अटक केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरणच बोगस असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केले होते. आता नोकरी वाचविण्यासाठीच समीर वानखेडे हे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवत आहेत, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
मी उद्या मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे. या मतदारसंघात माझा विजय होणार आहे. लोकांना घाबरवणे, धमकावणे, पैसे उकळणे आणि फसवणे, असे चित्रपटांमध्ये दाखल्याप्रमाणे या मतदारसंघात सुरु आहे. या मतदारसंघातील मुख्य प्रश्न अंमली पदार्थांचा आहे. यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.