निवडणूकपूर्वीच मुंबईत कायदा सुव्यवस्थेला आव्हान!

बाबा सिद्दिकीचा गोळीबारात मृत्यू! दोन संशयित हल्लेखोर ताब्यात
Baba Siddiqui
बाबा सिद्दिकी
Published on
Updated on

मुंबई  : अजित पवार गटाचे वांद्रे येथील नेते माजी र‍ाज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ ते ४ राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीपूर्वीच त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बाबा सिद्दिकी यांच्यावर १२ ऑक्टोबरच्या रात्री ९.१५ च्या सुमारास गोळीबार झाला. वांद्रे पूर्व येथील त्यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला होता. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर झाले होते. यातील एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली. या घटनेनंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त समजताच त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांनी तातडीने लिलावती रुग्णालयात धाव घेतली. तसेच अभिनेता संजय दत्त ही लिलावती रुग्णालयात धावला. राष्ट्रवादीचे अनेक नेतेही लिलावती रुग्णालयात दाखल होत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबाराचा प्रकार घडला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news