Rain Derivatives Contract | ‘एनसीडीईएक्स’ने बाजारात आणला रेनमुंबई वायदा व्यवहार

Rain Derivatives Contract |
Rain Derivatives Contract | ‘एनसीडीईएक्स’ने बाजारात आणला रेनमुंबई वायदा व्यवहार
Published on
Updated on

मुंबई : मान्सूनची अनिश्चितता गुंतवणुकीचे साधन म्हणून विकसित करत नॅशनल कमॉडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंजने (एनसीडीईएक्स) रेनमुंबई हा वायदा व्यवहार बाजारात आणला?आहे. हा वायदा वेदर डेरिव्हेटिव्ह स्वरूपात सादर झाला असून, तो देशातील पहिला सेबी-मान्यताप्राप्त, एक्स्चेंज-ट्रेडेड कॉन्ट्रॅक्ट आहे. यांतर्गत प्रत्यक्ष व्यवहारांना 29 मेपासून सुरुवात होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून विस्कळीत पावसामुळे शेतीविषयीचे पारंपरिक अडाखे चुकत आहेत. या पावसाचा फटका शेतीप्रमाणेच शहरी भागालाही बसत आहे. ‘हे डेरिव्हेटिव्ह मान्सूनच्या अनिश्चिततेला एका नियमन चौकटीत बसवून अनिश्चितता युनिटमध्ये मोजता येण्याजोग्या आणि व्यापार करता येण्याजोग्या आर्थिक जोखमीत रूपांतरित करण्यासाठी तयार करण्यात आले आहे,’ असे ‘एनसीडीईएक्स’ने म्हटले आहे.

‘एनसीडीईएक्स’ने आणले पहिले ‘वेदर डेरिव्हेटिव्ह’

रेनमुंबई वायदा विकसित करण्यासाठी ‘एनसीडीईएक्स’ने ‘आयआयटी मुंबई’चे सहकार्य घेतले आहे. मुंबई परिसरातील पर्जन्यमानाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) घेतला जाणार आहे. ‘रेनमुंबई’मध्ये गुंतवणूक करणार्‍यांना पावसातील चढ-उतारांमुळे उद्भवणार्‍या आर्थिक जोखमीचे हेजिंग करता येणार आहे. ‘रेनमुंबई’ मान्सून हंगामात मुंबईच्या पावसातील दीर्घकालीन सरासरीपासूनच्या फरकाचा मागोवा घेईल. एक मि.मी. पाऊस हे गुंतवणुकीचे एक युनिट असून, त्याची किंमत 50 रुपये असेल. किमान ऑर्डर 50 लॉटची असेल.

‘रेन फ्युचर्स’वरून ‘स्कायमेट’चा न्यायालयीन एल्गार!

शेअर बाजार, सोने, कच्चे तेल आणि कृषी मालानंतर आता देशात पावसावरही फ्युचर्स व्यवहार सुरू होणार आहेत. तथापि, या नव्या आर्थिक प्रयोगाच्या उंबरठ्यावरच मोठा वाद निर्माण झाला आहे. देशातील आघाडीची खासगी हवामान अंदाज संस्था ‘स्कायमेट वेदर सर्व्हिसेस’ने नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंजच्या (एनसीडेक्स) ‘रेनफॉल फ्युचर्स’ प्रकल्पाविरोधात न्यायालयीन लढाई छेडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एनसीडेक्स’ने 29 मेपासून सुरू होणार्‍या या व्यवहारांसाठी सरकारी हवामान संस्था असलेल्या ‘भारतीय हवामान विभागा’शी (आयएमडी) करार केला आहे. या कराराला ‘स्कायमेट’ने थेट आव्हान दिले आहे. तीन वर्षांपूर्वी याच प्रकल्पासाठी ‘एनसीडेक्स’ने ‘स्कायमेट’ची मदत घेतली होती; मात्र प्रत्यक्ष व्यवहार सुरू करताना सरकारी संस्थेकडे वळल्याने हा संघर्ष उभा राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news