Narco King Naveen Drug Case | ड्रोन अन् गुप्त मार्गाने कोकेनची तस्करी; 'नार्को किंग' नवीन चिचकरची 41 लाखांची मालमत्ता जप्त

Narco King Naveen Drug Case | 'नार्को किंग' नवीन चिचकर एनसीबीकडून स्थानबद्ध
Drug Case
Drug Case Pudhari
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई आणि नवी मुंबईसह महाराष्ट्रात अमली पदार्थांचे नेटवर्क चालविल्याचा आरोप असलेल्या नवीन गुरुनाथ चिचकर याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) वर्षभर स्थानबद्ध केले आहे. त्यानुसार चिचकरला पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून चेन्नईतील पुझल मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे.

Drug Case
Third Mumbai development: अटल सेतूपासून गावकुसापर्यंत रायगडचा विकासवेग; ‘तिसऱ्या मुंबई’च्या उभारणीला नवी दिशा

एनसीबीच्या माहितीनुसार, त्याच्या कथित आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ नेटवर्कवर अंकुश ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. एनसीबीच्या तपासानुसार, चिचकरचे नाव २०२१ मधील अमली पदार्थांच्या प्रकरणात समोर आले होते.

या प्रकरणांनंतर तो भारताबाहेर गेला असावा. फरारीच्या काळात त्याचे थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिराती आणि व्हानुआतू या देशांतील ड्रग्ज तस्करांशी संबंध आल्याचे तपासात समोर आले आहे. परदेशात असताना भारतातील अमली पदार्थांच्या तस्करीचे व्यवहार तो नियंत्रित करत होता. त्यामुळे त्याला केवळ नियमित गुन्हेगारी कारवाईत ठेवण्याऐवजी प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा निर्णय घेण्यात आला.

Drug Case
Gallantry Medal: मुंबई अग्निशमन दलाच्या १३ जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक

लंडनमध्ये शिक्षण ते ११२८ कोटींचे ड्रग्ज रॅकेट

नवी मुंबईचा रहिवासी असलेला उच्चशिक्षित नवीन चिचकर अचानक ड्रग्ज तस्कर कसा बनला हा शोधाचा विषय झाला आहे. नवीन उच्च शिक्षणासाठी लंडनला गेला, तिथे त्याने गुन्हेगारीचे मानसशास्त्र तसेच चित्रपट आणि दूरचित्रवाणीचा अभ्यास केला. याच दरम्यान तब्बल ११२८ कोटींचे ड्रग्ज रॅकेट मुंबई एनसीबीने २०२५ साली उघडकीस आणले. या रॅकेटचा सूत्रधार म्हणून नवीन चिचकरचे नाव तेव्हा पुढे आले.

तपास आणि कारवाईतील महत्त्वाचे मुद्दे

  • कोकेन अन् अमली पदार्थांची तस्करी : परदेशातून भारतात कोकेन आणि इतर अमली पदार्थ पाठविण्यासाठी विविध मार्गांचा वापर चिचकरने केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

  • इंटरपोल रेड नोटीस : भारताबाहेर असताना चिचकरविरोधात इंटरपोल रेड नोटीस जारी करताच त्याचा ठावठिकाणा मलेशियात लागला आणि त्याला भारतात आणण्यात आले.

  • ४१.६४ लाखांची मालमत्ता गोठवली : चिचकरने अमली पदार्थ तस्करीतून मिळालेल्या पैशांचा वापर मालमत्ता खरेदीसाठी झाल्याचा संशय आहे. यापूर्वी त्याची ४१.६४ लाख रुपयांची मालमत्ता एनसीबीने गोठवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news