Navi Mumbai crime : नवी मुंबईत वाशी पोलिसांकडून 13 कोटींचा हायड्रा गांजा जप्त

तिघांच्या आवळल्या मुसक्या: 3 दिवसांची पोलीस कोठडी
Navi Mumbai crime
वाशी :हायड्रा गांजा विक्री प्रकरणातील आरोपींना पोलीस ठाण्यात नेत असताना.pudhari photo
Published on
Updated on

कोपरखैरणे : प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेल धर्तीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची स्थापना करून एक महिनाही उलटला नाही तोच वाशी पोलिसांनी एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. सध्या सर्वाधिक मागणी असणारा हायड्रा गांजा विक्री प्रकरणी तीन संशयित आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्या कडून 12 कोटी 91 लाखांचा गांजा जप्त केला आहे. संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे.

नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत नशामुक्त नवी मुंबई अभियान राबवले जात असून आता केंद्र आणि राज्य सरकारने अंमली पदार्थ प्रकरणी अत्यंत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याच अनुषंगाने प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वाशी पोलीस ठाण्यातील या पथकाला मोठे यश मिळाले आहे.

Navi Mumbai crime
Mathadi workers protest : जादा ओझ्याखाली पिचतोय माथाडी

वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई राहुल मंगलसिंग भोई व अशोक सुभाष शिंदे हे 25 तारखेला रात्री गस्त घालत होते. यावेळी वाशी रेल्वे स्टेशन परिसरात दोन ते तीन व्यक्ती चारचाकी वाहनातून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावर त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांना ही माहिती दिली. गांभीर्य ओळखून त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान विले, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे, काशिनाथ नरळे वैभव रूपवते पोलीस हवालदार महेश आव्हाड आदींचे पथक धाडले.

रात्रभर गस्त घालत असताना गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास वाशी रेल्वे स्टेशन परिसरातील सिडको एक्झीबिशन व राजस्थान भवन मधील मार्गावर संशयित आढळून आलेली ओरा ग्रे रंगाची कार अडवली आणि त्यातील तिघांना ताब्यात घेतले. श्याम शिवकुमार बनवानी, संदीप दिलीप पाटील व अनिकेत सुनिल तेलंगी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यात 12 कोटी 91 लाख रुपयांचा 12.910 किलो वजनाचा हायड्रो गांजा आढळून आला. यावर पोलिसांनी तात्काळ तिन्ही संशयितांना अटक केली.

Navi Mumbai crime
Hawker mafia Mumbai : मुंबईत फेरीवाल्यांच्या माफिया टोळ्या!

संशयित अटक आरोपी कडून 12 कोटी 91 लाख रुपयांचा 12.910 किलो हायड्रो , 5 लाख रुपयांची कार , 28 हजार रुपयांची रोकड व सुमारे 50 हजार रुपयांचे तिघांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी पथक स्थापन केल्यापासूनची ही सर्वात मोठी कामगिरी आहे. केवळ अमली पदार्थ तपास एवढे काम या पथकाला दिल्याने हे यश मिळाले आहे. आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या आदेशानुसार नाशामुक्त नवी मुंबई अभियातील हा एक टप्पा आहे. संशयित आरोपींनी हा गांजा कुठून आणला, कोणी मागवला आहे, याबाबतची माहिती घेतली जात आहे.

पंकज डहाणे, उपायुक्त, परिमंडळ एक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news