Navi Mumbai ACP posting : महामुंबईला मिळाले नवे सहाय्यक पोलीस आयुक्त

गृहविभागाकडून राज्यातील 29 अधिकार्‍यांच्या बदल्या
Navi Mumbai ACP posting
महामुंबईला मिळाले नवे सहाय्यक पोलीस आयुक्तpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : राज्य पोलीस दलातील बदल्यांचे सत्र सुरूच असून गुरुवारी सायंकाळी सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या 29 अधिकार्‍यांची बदली करण्यात आली. गृहविभागाचे सहसचिव व्यकंटेश भट यांनी बदल्यांचे आदेश जारी केले असून बदली झालेल्या पोलीस अधिकार्‍यांनी बदलीच्या जागी तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

यात महामुंबईला नवे सहाय्यक पोलीस आयुक्त मिळाले आहेत. फोर्स वनचे पोलीस उपअधिक्षक सुनिल रामदास लाहिगुडे यांची मुंबईत, ठाण्यात रायगड-रोहाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र दौंडकर, मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा जीवन कट्टे यांची नवी मुंबईत तर बजरंग हिंदूराव देसाई यांची मिरा-भाईंदर-वसई-विरार येथे बदली करण्यात आली आहे.

मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त दौलत आबाजी साळवे यांची पिंपरी-चिंचवड, शशिकिरण बाबासो काशिद यांची अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी, मनिषा सदाशिव नलावडे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अप्पर पोलीस उपायुक्त, विजय शंकरलाल जैस्वाल यांची दहशतवाद विरोधी पथक, अजीत राजाराम टिके यांची सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरा-भाईंदर-वसई-विरारचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश शंकर माने यांची भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल विलास कोळी यांची गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश संजयराव कुलकर्णी यांची अमरावतीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाण्याचे माधवराव रावसाहेब गरुड यांची अमरावतीच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

रोशन भुजंगराव पंडित यांची नागपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र रामचंद्र खाडे यांची अमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस उपअधिक्षक, रविंद्र पांडुरंग चौधर यांची लातूर-चाकूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रशांत पांडुरंग संपते यांची लातूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस उपअधिक्षक, बीड-गेवराईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निरज बाजीराव राजगुरु यांची अहिल्यानगर-शेवगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत नारायण सावंत यांची सातरा-दहिवडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, समीरसिंध द्वारकोजीराव साळवे यांची लातूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, अमरावतीचे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे पोलीस उपअधिक्षक श्रीहरी भानुदास पाटील यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र, सुनिल सदाशिव साळुंखे यांची सातारा-वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

निलेश श्रीराम पालवे यांची छत्रपती संभाजीनगर-गंगापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत औंदुबर दिसले यांची दक्षता पथक, पुणे कारागृह व सुधारसेवेच्या पोलीस उपअधिक्षक, छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त रणजीत जगन्नाथ पाटील यांची पिंपरी-चिंचवड, चंदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची पिंपरी-चिंचवड, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर पोपट यादव यांची पिंपरी-चिंचवड, दिलीप देवराव टिपरसे यांची परभणी-गंगाखेडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, शंकर भाऊसाहेब काळे रायगडच्या महाड उपविभागीय पोलीस अधिकारी, निलेश विश्वासराव देशमुख यांची धाराशीव-तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी बदली केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news