

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला आहे. आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना 34 हजार 500, करार आणि तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांना 28 हजार 500 आणि आशा वर्कर यांना 18 हजार 500 इतका बोनस देण्यात येणार आहे. मागील वर्षीपेक्षा 15 हजारांची यात वाढ आहे.
महापालिकेतील एकूण 4,961 जणांना याचा लाभ मिळणार असून दिवाळीपूर्वीच ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासोबतच यावर्षी आरोग्य विभागातील कोविड, नॉन कोविड अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील घड्याळी तासिका प्राथमिक व माध्यमिक शिक्षक कर्मचारी आणि अंशकालीन निदेशक (कला, क्रीडा व कार्यानुभव) यांनाही 18 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. अशाप्रकारे 4,961 अधिकारी, कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यास येणार आहे.