Stenographer transfer issue: नवी मुंबई महापालिकेत लघुलेखकांच्या बदलीत अनियमितता

वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार
Navi Mumbai Municipal Coropration
Navi Mumbai Municipal CoroprationPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेत लघुलेखक (स्टेनोग्राफर) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. इतर सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार व वेळेवर होत असताना, लघुलेखक संवर्गातील अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार, बदलीचे आदेश निघाल्यानंतरही काही कर्मचारी नव्या ठिकाणी रुजू न होता विविध मार्गांनीवशिला किंवा आर्थिक प्रभावबदली रद्द करून पुन्हा त्याच विभागात कार्यरत राहतात. यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होत आहेत. लघुलेखक संवर्गाचे मूळ काम म्हणजे विविध बैठकींचे इतिवृत्त (मिनिट्स) तयार करणे.

Navi Mumbai Municipal Coropration
‌Aaple Sarkar Portal Issue: ‘आपले सरकार पोर्टल‌’चा तांत्रिक खेळखंडोबा सुरूच

मात्र प्रत्यक्षात अनेक लघुलेखक इतर विभागांत ‌‘आवक-जावक‌’ सारखी लिपिकीय कामे करत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, ज्या विभागात त्यांच्या कौशल्याची खरी गरज आहे, तिथे मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर महासभा, स्थायी समिती, परिवहन समिती, प्रभाग समिती आदी विविध बैठकींचे इतिवृत्त तयार करण्याचे काम वाढले आहे.

या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, ‌‘ज्या विभागात ज्या पदांची गरज आहे, तिथे तातडीने पदस्थापना करून कामकाज सुरळीत करावे, अशी मागणी जोर धरत आहे. सचिव विभागाकरिता शासनाच्या मंजूर आकृतिबंधानुसार 1 उच्चश्रेणी लघुलेखक व 5 निम्नश्रेणी लघुलेखक अशी एकूण 6 वरिष्ठ लघुलेखक पदांची मान्यता असताना, सचिव विभागात 3 लघुलेखक कार्यरत आहेत.

त्यामुळे सचिव विभागामध्ये कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला असून, कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त व कामाचा भार पडत आहे. कार्यालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Navi Mumbai Municipal Coropration
Mumbai News: वडाळा पुनर्विकासावर अखेर पालिकेची मोहोर; प्रस्ताव बहुमताने मंजूर

अशी आहे लघुलेखकांची विविध विभागांमधील नियुक्ती

लेखा विभाग व मुख्य लेखापरीक्षक विभागाकरिता 1 निम्नश्रेणी लघुलेखक कार्यरत असून त्यांच्याकडे लेखापरीक्षण विभाग व लेखा विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. नगररचना विभागाकरिता 1 निवडश्रेणी लघुलेखक कार्यरत आहेत. आयुक्त यांचेकरीता 1 उच्चश्रेणी लघुलेखक व 1 निम्नश्रेणी लघुलेखक कार्यरत आहेत.

शिक्षण विभागाकरिता 1 निम्नश्रेणी लघुलेखक कार्यरत आहेत. अतिरिक्त आयुक्त यांचेकडे 2 निम्नश्रेणी लघुलेखक कार्यरत आहेत. अतिक्रमण विभागाकरिता 1 लघु टंकलेखक कार्यरत आहे. महापौर कार्यालयाकरिता 2 निम्नश्रेणी लघुलेखक कार्यरत आहेत. उपमहापौर कार्यालयाकरिता 1 निम्नश्रेणी लघुलेखक कार्यरत आहेत.

कार्यरत लघुलेखक कर्मचाऱ्यांची संख्या :

निवडश्रेणी लघुलेखक 01

उच्चश्रेणी लघुलेखक 04

निम्नश्रेणी लघुलेखक 13

लघु टंकलेखक 01

लघु टंकलेखक (करार पद्धतीवरील) 01

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news