Navi Mumbai rain update : नवी मुंबईत 24 तासात धुवाधार; 187.97 मिमी पावसाची नोंद

धुवाधार पावसामुळे शहराला काहीसा दिलासा मिळाला असला तरी, ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्याने प्रशासनाची दमछाक
Navi Mumbai rain update : नवी मुंबईत 24 तासात धुवाधार; 187.97 मिमी पावसाची नोंद
Published on
Updated on

Navi Mumbai intense rainfall, recording 187.97 mm in the last 24 hours

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत पावसाने जोरदार हजेरी लावली असून, सरासरी 187.97 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या धुवाधार पावसामुळे शहराला काहीसा दिलासा मिळाला असला तरी, ठिकठिकाणी पडझडीच्या घटनांमुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

Navi Mumbai rain update : नवी मुंबईत 24 तासात धुवाधार; 187.97 मिमी पावसाची नोंद
Mumbai Rain : नवी मुंबईत अखेर पावसाची हजेरी, नागरिकांना मोठा दिलासा

गेल्या चौवीस तासात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 187.97 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बेलापूर विभागात 290.80 मिमी, नेरूळ विभागात 130.40 मिमी., वाशी विभागात 107.60 मिमी., कोपरखैरणे विभागात 162.40 मिमी, ऐरोली विभागात 213.20 मिमी, आणि दिघा विभागात 223.40 मिमी. पर्जन्यवृष्टी नोंदविली गेली आहे. यावर्षी आत्तापर्यंत नमुंमपा क्षेत्रात - 624.84 मिमी. इतकी पर्जन्यवृष्टी झालेली आहे. त्याचप्रमाणे मोरबे धरण क्षेत्रातही 2 जुलै रोजी सकाळी 8.30 वा. पर्यंत 154.40 मिमी. इतक्या पावसाची नोंद झालेली आहे.

Navi Mumbai rain update : नवी मुंबईत 24 तासात धुवाधार; 187.97 मिमी पावसाची नोंद
Heavy rain : शहरात अडीच तास जोर 'धार'; सीना, कुंडलिका नद्या वाहिल्या !

मोरबे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस; पाणी पातळीत वाढ

1 जूनपासून आतापर्यंत धरणक्षेत्रात 425.20 मिमी पाऊस झाला असून मोरबे धरणाची पातळी 69.67 M मीटर झाली असून, 26.90 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. मोरबे धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चलली आहे याची चिंता व्यक्त करीत आपण सारे जण पावसाची आतुरतेने वाट बघत होतो. मात्र आता पाऊस आल्यानंतर मोरबेची पातळी वाढत आहे. शहरात चौवीस तासात ठिकठिकाणी आगीच्या 03, झाडे पडली - 32, पाणी साचणे- 05 आणि जखमी 02 अशा घटना घडल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news