Mumbai Crime : महिला प्रवाशासमोर कॅब चालकाचे अश्लील चाळे

नेरुळ पोलिसांनी चालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

नेरूळ : कॅबमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशासमोरच चालकाने अश्लील कृत्य केल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. वाशी ते नवीन पनवेल असा प्रवास सुरू असताना चालकाने गाडी चालवत असतानाच आपले गुप्तांग बाहेर काढून अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. महिलेने प्रसंगावधान राखत चालकाला विरोध केला. या तक्रारीनंतर नेरुळ पोलिसांनी चालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे.

पीडित महिला आपल्या आई-वडिलांसह रॅपिडो कॅबने वाशी येथून नवीन पनवेलला जात होती. कॅबमध्ये महिला पुढील सीटवर, तर तिचे आई-वडील मागील सीटवर बसले होते. सायन-पनवेल महामार्गावर नेरुळ येथील रहेजा कन्स्ट्रक्शनसमोर कॅब आली असता,चालकाने गाडी चालवत असतानाच गुप्तांग बाहेर काढून अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

Crime News
Mumbai News : मालाड हॉटेल वादप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

हा प्रकार लक्षात येताच महिलेने चालकाला जाब विचारत त्याला विरोध केला. त्यानंतर चालकाने आपले कृत्य थांबवले. महिलेने संबंधित चालकाला खांदेश्वर पोलीस ठाण्यात नेले. मात्र, तेथून तिला नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पाठवण्यात आले.

Crime News
Ratnagiri News : अठराव्या शतकातील ओझर गावातील वतन प्रकरण उलगडले !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.