Woman Molestation Case : नवी मुंबई विमानतळाबाहेर धक्कादायक घटना; कॅब चालकाकडून महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न, आरोपी ताब्यात

या घटनेनंतर नवी मुंबई विमानतळ परिसरातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे
Woman Molestation Case : नवी मुंबई विमानतळाबाहेर धक्कादायक घटना; कॅब चालकाकडून महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न, आरोपी ताब्यात
Published on
Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या बाहेर कॅब चालकाने महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकटी महिला कॅबमधून प्रवास करत असताना चालकाने काळोख्या रस्त्याचा फायदा घेत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Woman Molestation Case : नवी मुंबई विमानतळाबाहेर धक्कादायक घटना; कॅब चालकाकडून महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न, आरोपी ताब्यात
Molestation case in Beed : विवाहित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, महिला कॅबमधून प्रवास करत असताना विमानतळाबाहेरील निर्जन रस्त्यावर कुणीही नसल्याचा फायदा घेत चालकाने पाणी पिण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली. त्यानंतर तो मागील सीटवर बसलेल्या महिलेच्या जवळ गेला. त्याने महिलेचा हात पकडून तिच्या कपड्यांना हात घालत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने धाडस दाखवत मोठ्याने आरडाओरडा केला आणि तत्काळ गाडीतून खाली उतरली. महिला खाली उतरताच चालकाने गाडी सुरू करून घटनास्थळावरून पळ काढला.

Woman Molestation Case : नवी मुंबई विमानतळाबाहेर धक्कादायक घटना; कॅब चालकाकडून महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न, आरोपी ताब्यात
Woman Molestation | मद्यधुंद पोलिसांकडून महिलेचा विनयभंग

या घटनेची माहिती महिलेने विमानतळ पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. पोलिसांनी आरोपी मोहम्मद अफजल शेख याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, काळोख्या आणि निर्जन रस्त्याचा फायदा घेत एकट्या महिला प्रवाशावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्याने नवी मुंबई विमानतळ परिसरातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. या प्रकरणात पोलिस पुढे कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news