शरद पवार, संजय राऊत पेट्रोल, काडी घेऊनच फिरतात: नारायण राणेंचा हल्लाबोल

Narayan Rane on MVA | 'मविआ' नेत्यावर राणेंची घणाघाती टीका
Narayan Rane on MVA
खासदार नारायण राणे यांनी शरद पवार, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यावर पत्रकार परिषदेत टीका केली. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काडी आणि पेट्रोल घेऊन तयार असतात. पवार सत्तेत असताना मराठा आरक्षण का दिले नाही?, असा सवाल करून पवार काहीही कामाचा माणूस नाही, अशी घणाघाती टीका सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आज (दि. २) पत्रकार परिषदेत केली. यावेळी राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला. (Narayan Rane on MVA)

म्हणून आदित्य ठाकरेला राजकोट किल्ल्यावरून जाऊ दिले 

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेनंतर ठाकरे गटाकडून विनाकारण घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यस्थी केल्याने आदित्य ठाकरेला राजकोट किल्ल्यावरून जाऊ दिले, असे राणे यांनी यावेळी सांगितले. (Narayan Rane on MVA)

पंतप्रधान मोदी यांच्यावर बोलण्याची ठाकरेंची लायकी नाही 

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये. ठाकरेंकडे बघून असे वाटतं की हे मुख्यमंत्री का झाले?, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना ठाकरे यांनी महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेले. पंतप्रधान मोदी यांच्यावर बोलण्याची त्याची लायकी नाही. त्यांना प्रशासनाचे ज्ञान नाही, कायद्याची माहिती नाही. आम्हाला शिवदोह्री म्हणणारे ठाकरे कोण ? असा सवाल राणे यांनी केला.

पुतळा दुर्घटनेवर 'मविआ'कडून गलिच्छ राजकारण सुरू आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेवरून निवडणुकीसाठी राजकारण केले जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आगलावे आहेत. पेट्रोल घेऊन फिरतात, अशा शब्दांत राणे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

Narayan Rane on MVA
गडकिल्ल्यांचा सातबारा राणे यांच्या बापाचा नाही : सुषमा अंधारे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news