मतदार याद्यांतून नावे वगळली; पराभवाच्या भीतीने भाजपचा रडीचा डाव : नाना पटोले

Nana Patole | शिवालय येथे 'मविआ'चा पत्रकार परिषदेत
Nana Patole on BJP
शिवालय येथे 'मविआ'चा पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर आरोप केला. Congress X Account
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूंमीवर मतदार याद्यातून नावे वगळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिखली मतदारसंघात ७ नंबरचा ऑनलाईन अर्ज करून मतदारांची नावे कमी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने हा सर्व प्रकार सुरू आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि.१८) शिवालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल देसाई, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने भाजपचा हा रडीचा डाव सुरू आहे. परंतु, भाजप आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. दम असेल तर समोरासमोर येऊन महायुतीने लढावे. पराभवाच्या भीतीने मतदार याद्यात घोळ घालण्याचे काम सुरू आहे. भाजपने मतदार यादीतून अनेक नावे वगळण्याचे आदेश दिले आहेत. जाणीवपूर्वक नावे वगळली आहेत. ७ नंबरचा ऑनलाईन अर्ज कोण भरत आहे, याची माहिती निवडणूक आयोगाकडे नाही. तरी आयोगाने यामध्ये तातडने लक्ष घालावे. तसेच महायुतीचा प्रचार करण्यासाठी राज्याच्या तिजोरीची उधळपट्टी सुरू आहे. भाजपच्या योजना दूतांचा सुळसुळाट झाला आहे, त्यांचा पर्दाफाश करावा. राज्याच्या तिजोरीला वाचविण्य़ाची गरज आहे, असे पटोले म्हणाले.

आव्हाड म्हणाले की, सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत आहे. एका गावातील ५ हजार मतदारांची नावे वगळली आहेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शीपणा नाही. मतदार यादींची प्रिटिंग अस्पष्ट दिसत आहे. एका घरातील पाच माणसे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदान करायला जाणार आहेत. ७ नंबरचा ऑनलाईन अर्ज कोण भरत आहे, तेच कळत नाही.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ज्या ठिकाणी अधिक मते मिळाली. तेथे हा प्रयोग करण्यात येत आहे. मत कमी करण्याचा महायुतीचे प्लॅलिंग आहे. मतदार यादीत प्रचंड गोंधळ आहे. मतदार यादीतील नावही वाचता येत नाही. तरी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आही की नाही याची खातरजमा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Nana Patole on BJP
Maharashtra Assembly Polls | मविआमध्ये काँग्रेसच्या वाट्याला ८४ जागा : नाना पटोले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news