महायुतीसमोर ‘मविआ’ची कसोटी

उपराजधानी नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशन
Nagpur Winter Session
नागपूर हिवाळी अधिवेशनFile Photo
Published on
Updated on

मुंबई : अवघा महाराष्ट्र थंडीच्या कडाक्याने गारठला असताना उपराजधानी नागपूर येथे सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने महाविकास आघाडी व महायुती आमने-सामने येणार असून, अवघे 47 आमदारांचे पाठबळ असलेल्या आघाडीची 237 इतके संख्याबळ असलेल्या महायुतीच्या तोफखान्यासमोर आव्हान टिकवून ठेवण्याची कसोटी लागणार आहे.

दुसरीकडे, विरोधकांकडे शेतकर्‍यांची कर्जमाफी, पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मिळालेली अपुरी आर्थिक मदत, राज्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि परभणीतील हिंसाचाराचे पडसाद आदी गोष्टींवरून सरकारचे वाभाडे काढण्याची संधी असली, तरी ते सत्ताधार्‍यांवर कसा अंकुश ठेवतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर नागपूर येथे सोमवार, दि. 16 ते 21 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. सलग सहा दिवस चालणार्‍या अधिवेशनात सरकारसमोर फारसे कामकाज नाही. त्यामुळे काम कमी आणि दिवस जास्त, अशी परिस्थिती असली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेवरून परभणीत उसळलेला हिंसाचार, आंबेडकरी अनुयायींवर पोलिसांनी सुरू केलेली कारवाई, बीड जिल्ह्यात सरपंचाची झालेली हत्या, कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात सात निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू या घटनांचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटून विरोधी पक्ष सत्ताधारी महायुतीची कोंडी करेल, अशी चिन्हे आहेत.

परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तेथे हिंसाचार उसळला होता. त्यावरून विरोधकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आणि विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. अधिवेशनात हे प्रकरण उपस्थित करून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news