BDD Chawl Mumbai: सात वर्षांची प्रतीक्षा संपणार! ना. म. जोशी मार्ग बीडीडीवासीयांना नवरात्रोत्सवात मिळणार ५५७ घरांचा ताबा

ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांना नवरात्रोत्सवात ५५७ पुनर्वसित घरांचा ताबा देण्याची तयारी; सात वर्षांची प्रतीक्षा संपणार.
Home
Home(Pudhari File Photo)
Published on: 
Updated on: 

मुंबई: सात वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहणाऱ्या ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. पुनर्वसन प्रकल्पातील ५५७ घरांचा ताबा नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर देण्याची तयारी मुंबई मंडळाने सुरू केली आहे.

ना. म. जोशी मार्ग येथील दोन पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण झाले असून त्यामधील ३४२ सदनिकांना नुकतेच भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे.

Home
Urban Health Maharashtra: शहरी आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल! स्वतंत्र आयुक्तालयाची रचना; महापालिकांसह नगरपालिकांना थेट अहवाल द्यावा लागणार

ही घरे सप्टेंबरअखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्याचे नियोजित होते. दरम्यान, या कालावधीत तिसऱ्या पुनर्वसित इमारतीचेही काम पूर्ण झाले आहे. या इमारतीमधील २१५ घरांना येत्या आठवडाभरात भोगवटा प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे ३४२ ऐवजी थेट ५५७ घरांचे एकत्रित वाटप करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे.

Home
Sahil Wakode Case: साहिल वाकोडे प्रकरणात तपासाला वेग! आयआयटी-बॉम्बे संचालकांची तब्बल १० तास चौकशी

बीडीडी चाळ पुनर्विकासाला सुरुवातीला मोठा विरोध असताना ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांनी सर्वप्रथम पुढाकार घेत आपली घरे रिकामी करून दिली होती. असे असूनही वरळी आणि नायगाव येथील रहिवाशांना दोन-तीन टप्प्यांत घरे मिळाली, मात्र ना. म. जोशी मार्ग येथील

एकाही कुटुंबाला आतापर्यंत ताबा मिळाला नव्हता. त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर म्हाडाने कामाला वेग दिल्याने आता ही प्रतीक्षा संपणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news