Municipal Corporation Election | एका प्रभागात चार उमेदवार मग मतदान कोणाला करायचे? महापालिकेच्या मतदानासाठीचं संपूर्ण गाईड!

राज्य निवडणूक आयोगाने जनजागृतीसाठी तयार केला व्हिडीओ, मतदारांनी कसे करावे मतदान
Municipal Corporation Election | एका प्रभागात चार उमेदवार मग मतदान कोणाला करायचे? महापालिकेच्या मतदानासाठीचं संपूर्ण गाईड!
Published on
Updated on

दिलीप शिंदे

ठाणे : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६जानेवारी रोजी मतमोजणी होईल. राज्यातील 29 ‘महानगरां’वर आपली पकड मजबूत करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. चार सदस्यीय प्रभागांमुळे मतदारांमध्ये मतदानाबद्दल संभ्रमावस्था आहे. मतदानाची ही प्रक्रिया नेमकी कशी आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊ या...

मुंबईवगळता इतर ठिकाणी प्रभाग रचना ?

मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये 'बहुसदस्यीय प्रभाग पद्धत' (Multi-member Ward System) रचनेप्रमाणे मतदान होत आहे. म्हणजेच चार किंवा तीन सदस्यांचा एक प्रभाग (Panel) असेल.

एका मतदाराला किती मते देता येणार ?

बहुसदस्यीय प्रभाग पद्धत असल्यामुळे एका मतदाराला ४ किंवा ३ मते देण्याचा अधिकार राहणार आहे. समजा मतदाराने त्याच्या अ वॉर्डापुरताच मतदान केले आणि इतर तीन ठिकाणी मतदान केले नाही तर त्याचे मत बाद ठरणार नाही, असं आयोगाने स्पष्ट केले आहे.

मतदारांचा गोंधळ का उडणार ?

अनेक मनपांमध्ये अनेक मतदारांसाठी ही मतदान प्रक्रीया नवीन आहे. यामुळे मतदारांचा मत देताना गोंधळ उडू शकतो. एका बॅलेट युनिटवर (जी मशीन मतदारासमोर असते) जास्तीत जास्त १६ उमेदवारांची (१५ उमेदवार + १ NOTA) नावे आणि चिन्हे असू शकतात. पण अधिक उमेदवार असतील तर मशीनची संख्या जास्त होऊन गोंधळ उडू शकतो. तसेच उमेदवार संख्या कमी असल्यास एकाच मशिनवर दोन प्रभागातील उमेदवारांची नावे असू शकतात. त्यातून गोंधळ उडू शकतो.

कशी असेल प्रभाग रचना व मतदान प्रक्रिया?

या बहूसदस्यीय प्रभागरचनेमुळे एका प्रभागात चार जागा असणार आहेत. एका प्रभागाचे उदाहरण घेऊ प्रभाग क्रमांक १० यामध्ये प्रभाग क्र. १० 'अ': ही जागा अनुसूचित जाती (SC) साठी राखीव असू शकतो. प्रभाग क्र. १० 'ब': ही जागा महिला (सर्वसाधारण) साठी राखीव असू शकतो. प्रभाग क्र. १० 'क': ही जागा सर्वसाधारण (Open) प्रवर्गासाठी असू शकतो. ड ही जागा अनुसुचित किंवा इतर आरक्षण उमेदवारांसाठी असू शकतो. दोन महिला उमेदवार हे अनिवार्य असून दोन जागा खुल्या गटासाठी आहे. यामुळे मतदारांना या चौघांना एक मत द्यावे लागू शकते. यासाठी मतदान केंद्रावर चार मशिन अथवा तीन मशीन असणार आहेत.

NOTA चे बटण किती असणार ?

प्रभाग रचनेनुसार एका मतदान केंद्रावर ४ किंवा ३ EVM मशीन असणार आहेत. तसेच वर सांगितल्याप्रमाणे प्रभागातील अ ब क ड अनुक्रमानुसार प्रत्‍येक बॅलेट युनिटवर त्‍या आरक्षणानुसार उमेदवारांची नावे असणार आहेत. आणि प्रत्‍येक मशिनवर शेवटी एक नोटाचे बटन असणार आहे. त्‍यामुळे एका मतदाराने तीन उमेदवारांना मते दिली व एक मत NOTA ला दिले तर ते ग्राहय धरले जाईल. दोन नोटाला दिले व दोन उमेदवाराला दिले तरीही ते मत योग्य ठरणार आहे. किंवा एखाद्या उमेदवाराने चार NOTA मते दिले तरी योग्य ठरणार आहे.

आयोगाने कशा पद्धतीने केली आहे मतदानप्रक्रीया

मतदान केंद्रावर २ ते ४ व्होटींग मशीन असणार आहेत. उमेदवारांच्या संख्येनुसार ते ठरणार आहे. कमी उमेदवार असतील व आरक्षीत प्रभाग एकसारखे असतील तर दोन मशीवरच उमेदवारांची नावे बसू शकतील. पण चार मतपत्रिकांचे चार वेगवेळे रंग असे असतील.

अ जागेसाठी पांढरा रंग

ब जागेसाठी फिका गुलाबी रंग

क जागेसाठी फिका पिवळा रंग

ड जागेसाठी फिका निळा रंग असेल

कसे होईल मतदान ?

मतदाराने अ जागेसाठी मतदान करताना प्रत्‍येक उमेदवाराचे नाव त्‍याच्यापुढे त्‍याचे उमेदवारी चिन्ह व बटण असणार आहे. बटन दाबल्यानंतर लाल लाईट लागणार. त्‍यानंतर ब जागेसाठी हिच पद्धत वापरा व क व ड जागेसाठी हिच पद्धत वापरा जर उमेदवार पसंद नसेल तर NOTA हे बटन दाबू शकता.

बझर केव्हा वाजणार ?

वरील प्रमाणे प्रत्‍येक जागेसाठी एकदा असे अ ब क व ड या जागांसाठी योग्य उमेदवारांसाठी. किंवा यातील एखाद्या जागेसाठी नोटा हा पर्याय दाबल्यानंतर शेवटच्या उमेदवारासमोरील बटन दाबल्यावर बझर वाजणार आहे. बझर वाजल्यानंतर तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

हे करणे आवश्यकच असणार ?

मतदान केंद्रावर एका प्रभागातील चार जागांवर चार वेगवेगळी मशिन असणार आहेत तसेच यामध्ये NOTA चा पर्याय देखिल असणार आहे. त्‍यामुळे प्रत्‍येक मतदाराला चार किंवा तीन मते ही द्यावीच लागणार आहेत. अ जागेसाठी मत दिले व थेट क जागेसाठी मत दिले तर तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्‍यामुळे जेवढ्या जागा आहेत तितकी मते टाकणे आवश्यकच असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news