

मृणालिनी नानिवडेकर
मुंबई : आता केवळ आरक्षित वॉर्ड नव्हे तर खुल्या वॉर्डाचे आकाश महिलांना खुले झाले आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकात वॉर्ड सर्वसाधारण असला तरी तेथे "लाडक्या बहिणीला " उमेदवारी देण्याचे नवे धोरण पुढे आले आहे. मुंबईतल्या लढती कमालीच्या प्रतिष्ठेच्या असल्या तरी भाजप, शिवसेना शिंदेगट, काँग्रेस अशा सर्व पक्षानी हे धोरण अवलंबले आहे.
पुणे, नागपूर, सोलापूर अशा छोट्या मोठ्या महापालिकातही खुल्या वॉर्डात ही संधी देण्यात आली आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकीतला यावेळी दिसणारा हा नवा बदल असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला रणरागिनी मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या त्यांच्या पक्षांच्या नेत्यांना या महिला आता पुरुषांनाही टक्कर देऊ शकतील असे वाटत असल्याने दिली गेली आहे.
पुणे शहरात महिलांसाठी राखीव असलेले वार्ड 83 असले तरी तब्बल 90 महिला रिंगणात उतरल्या आहेत. महिलावरचा हा विश्वास केवळ भारतीय जनता पक्षा पुरता नाही तर मुंबईच्या अत्यंत संघर्षमय लढायांमध्येही शिवसेना उबाठाने ही खुल्या प्रवर्गातून महिलेला संधी दिली आहे.महिलांच्या राखीव जागांचे धोरण काही वर्षांपूर्वी अमंलात आले. त्या धोरणाने किती लाभ झाला याचा अभ्यास केला जात असतो. त्यातच आता महिलांचे प्रतिनिधित्व वाढावे आणि राजकारण समन्यायी व्हावे यासाठी 33% महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षित जागा दिल्या जात आहे. मात्र या आरक्षणाचा स्वतःच्या ताकदीवर पुरुषांना आव्हान देऊ शकतील अशा महिला यावेळी मोठ्या प्रमाणात रिंगणात दाखल झाल्या आहेत.
मुंबईत भाजपाने नऊ महिलांना खुल्या प्रवर्गात उमेदवारी दिली आहे. वॉर्ड नंबर 25 मध्ये निशा परुळेकर बंगेरा, 57 मध्ये श्रीकला पिल्ले, 90 मध्ये ज्योती उपाध्याय, 98 क्रमांकाच्या बोर्डात माजी उपमहापौर अलका केरकर, 168 क्रमांकाच्या बोर्डात अनुराधा पेडणेकर, 190 अह क्रमांकाच्या बोर्डात नुकतेच पक्षांतर करून भाजपत आलेल्या शितल गंभीर देसाई आणि 225 क्रमांकाच्या बॉर्डर नार्वेकर यांच्या राजकीय घराण्यात सर्वात प्रथम निवडणूक राजकारणात प्रवेश करणाऱ्या हर्षिता यांना उमेदवारी दिली आहे.
सर्वसाधारण राखीव वार्डांमध्ये महिलांना उमेदवारी देण्याचा दमदार प्रयत्न तेवढा मर्यादित नाही तर मुंबईतील 111 क्रमांकाच्या ओबीसींसाठी राखीव बसलेला वार्डातही भारतीय जनता पक्षाने सारिका पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर 220 क्रमांकाच्या बोर्डात गुजराती समाजातील मराठी नेत्या गीता मकवाना यांना संधी दिली आहे. काँग्रेसमध्येही खुल्या वार्डात महिलांना संधी देण्यात आली आहे. 219 आणि 36 क्रमांकाच्या वार्डात ओबीसींसाठी राखीव असलेल्या या ठिकाणी अनुराधा कशेळकर आणि प्रियंका सानप या अनुक्रमे लढतील काँग्रेसने केवळ ओबीसी राखीव मध्येच महिलांना संधी दिलेली नाही तर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या महिला पुरुषांचे वर्चस्व मोडीत काढायला निघाले आहेत.
215 क्रमांकाच्या बोर्डात भावना गोळी कोळी या भाजप काँग्रेसतर्फे निवडणूक लढतील तर 140 क्रमांकाच्या बोर्डात प्रज्योती हंडोरे या राखीव असलेल्या वार्डात नशीब आजमावतील. प्रज्योती या चंद्रकांत हंडोरे यांच्या कन्या आहेत. शिवसेना उबाठासाठी मुंबईतील लढाई अस्तित्वाचा प्रश्न आहे पण तेथेही क्रमांक तीनच्या बोर्डात तो सर्वसाधारण खुला असतानाही रोशनी गायकवाड यांना संधी दिली आहे. लाडक्या बहिणींना भाऊबीज देणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मुंबईत ते लढवत असलेले 49 वॉर्ड राखीव असले तरी महिला उमेदवार दिल्या आहेत 63. खुल्या वॉर्डात 14 रणरागिणी उभ्या केल्या आहेत