

Mumbai Best bus ticket price hike
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईतील बेस्ट बसमधून प्रवासासाठी आता मुंबईकरांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. बेस्ट बसचे तिकीट आता दुप्पट होणार आहे. बेस्ट बसच्या तिकीटाच्या दरवाढीला महापालिकेने मंजुरी दिली आहे. याची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे.
तोट्यात चाललेल्या बेस्ट बस उपक्रमाला आता बस तिकीट दरवाढीला अखेर मान्यता मिळाली आहे. यामध्ये बसचे तिकीट आता दुपटीने वाढवण्याच्या बेस्टच्या प्रस्तावाला महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सध्या साध्या बसेससाठी किमान आकारले जाणारे बसभाडे आता पाच रुपयांऐवजी दहा रुपये आकारले जाणार आहे.
तर वातानुकूलित बसेसचे किमान भाडे सहा रुपयांवरून बारा रुपये एवढे आकारले जाणार आहे. महापालिकेने या तिकीट दरवाढीला मंजुरी दिल्याने याची अंमलबजावणी तात्काळ केली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना आता बेस्ट बस प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
या तिकीट दरवाढीमुळे बेस्टच्या महसुलात वाढ होणार आहे. मात्र प्रवाशांना अधिकचे पैसे मोजून प्रवास करावा लागणार असल्याने एक प्रकारे प्रवाशांना या दरवाढीचा फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे.