मुंबईकरांनी साधली वाहनखरेदीची पर्वणी; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तीन आरटीओंमध्ये ११३५ वाहनांची नोंद

ठाणे : अनेक नागरिकांनी परिवारासह जात शोरुममधून दुचाकी खरेदी केल्या.
ठाणे : अनेक नागरिकांनी परिवारासह जात शोरुममधून दुचाकी खरेदी केल्या.

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी वाहन खरेदी करण्याची पर्वणी साधली. या खेपेस दुचाकींची खरेदी अधिक करण्यात आली. मुंबई सेंट्रल आरटीओ वगळता इतर तीन आरटीओमध्ये मिळून एक हजार ३१९ नवीन वाहनांची नोंदणी झाली.
मुंबई शहरात मुंबई सेंट्रल (ताडदेव), अंधेरी, वडाळा आणि बोरिवली असे चार आरटीओ आहेत. अंधेरी आरटीओत सर्वाधिक अर्थात ४७२ वाहनांची नोंद झाली आहे. बोरिवलीत आरटीओत ४३० आणि वडाळा आरटीओत २७२ वाहनांची नोंद केली आहे. पाडव्याच्या दिवशी अर्थात बुधवार आणि मंगळवारची ही वाहन विक्रीची संख्या असल्याची माहिती आरटीओतील अधिकाऱ्यांनी दिली. ताडदेव आरटीओने पाडव्याच्या दिवशीची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. तिन्ही आरटीओत मिळून ७०५ दुचाकींची आणि ६१४ चारचाकींची नोंद झाली आहे.

यावर्षी मंदीचे वातावरण त्यातच वाहनांच्या वाढलेल्या किमतींमुळे नागरिकांनी वाहन खरेदीमध्ये आखडता हात घेतला. त्यामुळेच वाहन खरेदी जेमतेमच झाली. दरवर्षी साडे तीन मुहूर्तांपैकी असलेल्या गुढी पाडव्याच्या मुहुर्तावरच गाडी मिळावी यासाठी नागरिक वाहन विक्रेत्यांकडे तगादा लावतात. गेल्या काही वर्षापासून पाडव्याच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी एक -दोन दिवस आधी गाडी दारात आणली जाते. यावेळीही अनेकांनी गुढी पाडव्याच्या आधीच गाडी दारात आणली होती.

दुचाकीला पसंती

मुंबईत सुरु असलेली विविध विकासकामे, रस्त्यांची स्थिती, वाहतूक कोडी, पार्किंगची बोंब त्याचबरोबर पेट्रोलचे वाढलेले दर यामुळे मुंबईकरांनी चारचाकीपेक्षा दुचाकीला जास्त पसंती दिली आहे. दुचाकी खरेदीकरिता कमी डाउनपेमेंट, कमी वेळात कर्ज उपलब्ध होते, त्यामुळे नागरिक दुचाकी खरेदीला प्राधान्य देतात. बुधवारी ७०५ दुचाकींची नोंददुचाकीच्या किमती गतवर्षीपेक्षा १० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news