Mumbai Local Train | पश्चिम रेल्वेवर तीन महिन्यांचा मोठा ब्लॉक; गोरेगाव ते सीएसएमटी लोकल सेवा बंद राहणार

५ व ६ व्या मार्गिकेच्या कामासाठी दीर्घकालीन ब्लॉक घेण्यात येणार
Goregaon to CSMT Local Cancelled
Goregaon to CSMT Local Cancelled Pudhari
Published on
Updated on

Goregaon to CSMT Local Cancelled

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाला गती देण्यासाठी गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यानची लोकल सेवा तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नव्या मार्गिकांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी वांद्रे-खार रेल्वे पूल काढून त्याची पुनर्रचना केली जाणार असून, त्यासाठी हा दीर्घकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सध्या वांद्रे ते बोरिवली दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका उपलब्ध करण्यात आलेली आहे. मात्र वांद्रे ते सांताक्रूझ दरम्यान आवश्यक जागा उपलब्ध नसल्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम रखडले आहे. विशेषतः दाट लोकवस्ती, जुन्या इमारती आणि अपुरी जागा यामुळे या टप्प्यावर मोठ्या अडचणी येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Goregaon to CSMT Local Cancelled
Mumbai mayor election : मुंबई शहरला महापौरपदाचा मान?

हा संपूर्ण प्रकल्प पश्चिम रेल्वेवरील वाहतूक क्षमतेत लक्षणीय वाढ करणारा मानला जात असून, यासाठी सुमारे ९६४.८४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाला २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चर्चगेट ते विरार मार्गावरील लोकल सेवेचा वेग, वेळापत्रक आणि प्रवाशांची सोय अधिक सुधारेल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान जमीन अधिग्रहण हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. महालक्ष्मी–लोअर परेल परिसरातील शक्ती मिलची तब्बल ८८.५७३ चौरस मीटर जमीन या प्रकल्पासाठी आवश्यक असून, या जमिनीबाबतचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या भागातील कामाला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Goregaon to CSMT Local Cancelled
Mumbai Pune Road: भविष्यात मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे ठप्प झाल्यास चिंता मिटणार, हा मार्ग ठरणार पर्याय; सरकारचा मोठा निर्णय

याशिवाय वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरातील सुमारे १५५ कुटुंबांचे पुनर्वसन करणे देखील या प्रकल्पासाठी आवश्यक आहे. या कुटुंबांच्या योग्य पुनर्वसनाशिवाय पुढील काम सुरू करणे शक्य नसल्याने, सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवरही मोठे आव्हान रेल्वेसमोर उभे आहे.

दरम्यान, तीन महिन्यांच्या लोकल बंदमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार असून, पर्यायी व्यवस्था म्हणून बेस्ट बस सेवा, मध्य रेल्वेचा वापर आणि विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. तरीही, रोजच्या प्रवासावर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांच्या दृष्टीने हा कालावधी अत्यंत कठीण ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news