Mumbai Weather Update | मुंबईकरांनो सावधान! जुलैमध्ये 4 दिवस समुद्राला मोठे उधाण

4.72 मीटर उंचीच्या लाटा उसळणार
Mumbai Weather Update
जुलै महिन्यातील 22 ते 25 या 4 दिवसांत अरबी समुद्राला मोठे उधाण येणार आहे. file photo
Published on
Updated on

मुंबई : जुलै महिन्यातील 22 ते 25 या 4 दिवसांत अरबी समुद्राला मोठे उधाण येणार आहे. यावेळी समुद्रात सुमारे 4.59 ते 4.72 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे. त्यामुळे या चार दिवसांत चौपाटी अथवा समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी मुंबईकरांसह पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. (Mumbai Weather Update)

Summary

'या' दिवशी असणार भरती

  • सोमवार 22 जुलै दुपारी 12.50 वाजता 4.59 मीटर

  • मंगळवार 23 जुलै दुपारी 1.29 वाजता 4.69 मीटर

  • बुधवार 24 जुलै दुपारी 2.11 वाजता 4.72 मीटर

  • गुरुवार 25 जुलै दुपारी 2.51 वाजता 4.64 मीटर

मुंबईतील सर्वात आवडता पर्यटन स्थळ म्हणजे चौपाटी. त्यामुळे मुंबईकरांचा देशी- विदेशी पर्यटकांची जुहू चौपाटी दादर, गिरगाव, मढ, मार्वे, आक्सा, सात बंगला, वेसावे आधी चौपाटींसह मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. समुद्राला भरती असताना महाकाय लाटा किनाऱ्यावर धडकतात. त्यामुळे चौपाटींसह मरीन ड्राईव्ह गेटवे ऑफ इंडिया आदी ठिकाणी फेरफटका मारण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात येते. जुलै महिन्यात सलग चार दिवस समुद्राला मोठी भरती आहे. या काळात शहरात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत पर्यटकांनी फिरण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Mumbai Weather Update
Weather Forecast Today |'या' राज्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता

सतर्क राहण्याच्या सूचना

मुंबई महानगरपालिकेने आवाहन करूनही काही पर्यटक समुद्रकिनारी फिरायला जातात. काहीजण तर चक्क समुद्राच्या पाण्यात उतरतात. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते. यासाठी मुंबई महापालिकेने समुद्र किनाऱ्यालगत चौपाटीवर विशेष सुरक्षा पथक व जीव रक्षक नेमले आहेत. त्याशिवाय पोलिसांचीही गस्त असते. समुद्राला भरती असताना पर्यटक बुडण्याची भीती असल्यामुळे अग्निशमन दलालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Mumbai Weather Update
काळम्मावाडी, तुळशी धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news